
निपाणी (वार्ता) : समाजातील शोषित आणि वंचितांना माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या महापुरुषाने आयुष्य घालवले अशा महापुरुषांनी अपार हाल अपेष्टा सोसून वास्तवादी वाचनाचा संकल्प केला आहे. या वाचनातून त्यांना समाजातील भीषण परिस्थिती समजली आणि म्हणूनच त्यांनी समाजातील जातीय व्यवस्था व वर्णव्यवस्था याविरुद्ध संघर्ष केला. सामान्यातल्या सामान्य माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क प्राप्त करून दिला.अशा महामानवांची जयंती वैचारिकतेकडून केवळ दिखाऊपणाकडे झुकलेली असून वाचनापेक्षा नाचणच समाजाला प्रेरित ठेवत आहे. त्यामुळे विचारापेक्षा या महापुरुषांच्या समाजाला योग्य न्याय मिळणे आवश्यक आहे. सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात विरळ होत आहे. येणाऱ्या पिढीला ज्या महापुरुषांनी मानवतेची लढाई लढली ती केवळ वाचनातून लढली हे आजच्या पिढीच्या मनावर बिंबवणे गरजेचे असल्यामुळे शुक्रवारी (ता.११ ) व सोमवारी (ता.१४) महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीही वाचन संकल्पनेतून व्हावी. समाजाला योग्य दिशा व प्रेरणा मिळावी, यासाठी डॉ. आंबेडकर विचार मंचतर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
११ एप्रिल १९२५ रोजी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या निपाणी शहराच्या भूमीला पदस्पर्श होऊन शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने निपाणी नगरपालिकेसमोर संघटनेतर्फे ११ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता निरंतर वाचन अभियानाचा संकल्प करून महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
निपाणी व निपाणी परिसरातील नागरिकांनी त्या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. आंबेडकर विचार मंचतर्फे करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta