
निपाणी : निपाणी तालुक्यातील महाराष्ट्र एकीकरण युवा समिती यांच्या वतीने विविध उच्च प्राथमिक मराठी मुला-मुलींची शाळा येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. निपाणी तालुक्यात जितक्या सरकारी मराठी शाळा त्यांना पहिलीच्या वर्गात जितके विद्यार्थी प्रवेश घेतलेले आहेत त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचे उद्दीष्ट युवा समितीच्या वतीने पार पाडण्याचा उद्दीष्ट गाठत आहोत. समाजातील विविध स्तरातून कौतुक मराठी जनता समिती पदाधिकारी यांना आपले शैक्षणिक साहित्य वाटप कार्यांसाठी मदतीसाठी सर्व स्तरातून ओघ सुरू आहे. या माय मराठी जनतेसाठी आणि मुला- मुलींच्या भविष्य सोपे व्हावे आणि त्यांना शैक्षणिक समृध्दी अधिक यावी यासाठी समिती कायम आपल्या पाठीशी असणार आहे असे आश्र्वासित महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी तालुका अध्यक्ष श्री. अजित पाटील यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना विश्वास देण्यात आला.

यावेळी गोंदुकुप्पी, शेंडुर, यरनाळ, बदलमुख, तवंदी, हदनाळ, भटनांनुर, आप्पाचीवाडी, सोळगाव, मतिवडे या शाळांना युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी युवा समिती कार्याध्यक्ष गणेश माळी, कार्यकारी अमोल पाटील, आदित्य पाटील, विद्यार्थी, विद्यार्थिनी, मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta