
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी तज्ज्ञ समिती आणि उच्चाधिकार समितीची संयुक्त बैठक घेण्यासाठी पुढाकार घेऊ असे आश्वासन खासदार धैर्यशील माने यांनी दिले आहे.
निपाणी महाराष्ट्र एकीकरण समिती युवा समिती आणि नेतेमंडळींनी तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या खासदार माने यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले आहे. तज्ञ आणि उच्च अधिकार समितीची संयुक्त बैठक घेण्यासाठी आपण पुढाकार घेतला असून यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी पत्र व्यवहार केला आहे.

विशेषतः तज्ञ आणि उच्चाधिकार समितीची संयुक्त बैठक निपाणी येथील अर्जुन नगर येथे घेण्यासाठी विनंती केली जाणार असून विशेषता सीमा भागाचे प्रश्न आणि न्यायालयीन प्रक्रिया या बैठकीत सविस्तर चर्चा करून पुढील दिशा ठरवली जाणार आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. अच्युत माने, निपाणी समितीचे जयराम मिरजकर, लक्ष्मीकांत पाटील, खटावकर यादव आदी उपस्थित होते.
निपाणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तज्ञ समितीचे सह अध्यक्ष राज्यसभा सदस्य, धनंजय महाडिक यांचीही भेट घेतली आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta