

निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी तालुका यांच्या वतीने भिवशी, लखणापुर, पडलीहाल, अक्कोळ, ममदापूर येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी मीडिया खजिनदार नेताजी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, मराठी भाषा संस्कृती वाचविणे यासाठी युवा समिती शैक्षणिक साहित्य वाटप गेले चार वर्षे करत आहेत. मुलांनी मराठी मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे आपल्याला समजते आणि त्यामुळे सरकारी प्राथमिक शाळा वाचविणे आपले आणि सर्व सामान्य विद्यार्थी घडविण्याचे ज्ञान मंदिर टिकवून ठेवण्याचे काम सर्व सामान्य पालकांची जबाबदारी आहे तरी आपल्या पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेतच प्रवेश घ्यावा. सीमाभागातील विद्यार्थी पुढे शिवाजी विद्यापीठ सर्व विभागात शिक्षण हे मोफत आहे याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा यासाठी युवा समिती आपल्या पाठीशी सदैव उभी आहे.

मराठी भाषा, शाळा, संस्कृती वाचविणे हे समितीचे धेय्य आहे. तसेच आरोग्य सुविधा अशा अनेक बाबतीत आपल्याला महाराष्ट्र सरकार सीमाभागातील जनतेला शैक्षणिक, नोकरीमध्ये आरोग्यविषयक समस्या मुख्यमंत्री सहाय्य निधी देत आहे याचा लाभ जनतेने घ्यावा असे युवा समिती कार्याध्यक्ष संतोष निढोरे यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले.

यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती उपाध्यक्ष गणेश माळी, कार्यकारी अमोल पाटील यांच्यासह सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta