
निपाणी : निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी विभागाच्या वतीने तालुक्यातील सर्व मराठी भाषिकाना कळविण्यात येते की, अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी मतिवडे ता. निपाणी हिंदुराव मोरे यांच्या घरी रविवार दिनांक 27/07/2025 सायंकाळी 6.30 वाजता बैठक आयोजित केली असून, सर्वांनी उपस्थित राहून पुढील अजेंडा काय? कन्नडसक्ती सुरु आहे यावर व्यवस्थेला कायदेशीर उत्तर देण्यासाठी उपाय? सीमाप्रश्न उच्चाधिकार समितीची तात्काळ बैठक घेण्यासाठी प्रयत्न? सीमाप्रश्न संदर्भात आपापली काही वेगळी मते असतील तर मनमोकळेपणाने मांडावीत, सध्या आम्ही करत आहोत याकार्याबद्दल आणि कोणाच्या मनात काही शंका असतील तर बैठकीला उपस्थित राहून विचारावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta