
निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी विभागाची कार्यकारिणी जाहीर करून दोन वर्ष पूर्ण होत आहे त्या अनुषंगाने लढ्याला ऊर्जा देण्यासाठी तसेच संघटनेला बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी संघटनेची कार्यकारिणीची फेरनिवड करण्यात आली असून कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष या पदांसाठी नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली. ती कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करीत आहोत
अध्यक्ष : लक्ष्मीकांत पाटील, कार्याध्यक्ष : अमर विटे, उपाध्यक्ष : संदीप अमलझरे, सरचिटणीस : रमेश कुंभार, खजिनदार : तात्यासाहेब कांबळे, सोशल मीडिया विंग्स : कपिल बेलवळे.
सदस्य म्हणून किरण शिंदे (पांगिर), राकेश अमलझरे (मांगुर), अमर पाटील (सौंदलगा), अतिश जाधव (भिवशी), सतीश जाधव (सौंदलगा), अर्जुन केसरकर (मत्तीवडे), नवनाथ पाटील (मत्तीवडे), सनम कुमार माने (कोडणी), किरण गणपती कांबळे (भिवशी), दैवत गंगाधर कांबळे (भिवशी)
सल्लागार म्हणून प्रा. अच्युत माने (निपाणी), जयराम मिरजकर (निपाणी), सुनील कीरळे (निपाणी), राजकुमार मेस्त्री (निपाणी), गजानन बाळासाहेब शिंदे (शिरपेवाडी) यांची निवड करण्यात आली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta