Sunday , July 26 2026
Breaking News

तांब्याची चोरी करताना ग्रामीण पोलिसांकडून पाच जणांना अटक

Spread the love

 

बेळगाव: विविध कंपन्यांच्या केबल चोरी करताना पोलिसांनी पाच आरोपींना रंगेहाथ अटक केली आहे.

बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) बीएनएस-२०२३ अंतर्गत गुन्हा क्रमांक १२०/२०२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिरनवाडी नाका येथे ग्रामीण पोलिसांनी तपासणी केली असता आरोपींना तांब्याच्या तारा चोरताना पकडण्यात आले.

पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये रमेश उर्फ रामू नागप्पा धुळप्पगोळ (२२, मार्कंडेयनगर), संतोष उर्फ बल्या गणेश नायक (२३, नावगे क्रॉस – वाहनचालक), लगमप्पा बसप्पा येरगाणी (२५, मार्कंडेयनगर), सोमय्या अडवय्या हिरेमठ (२३, नावगे क्रॉस), आणि प्रज्वल विरुपाक्षी कंबी (२१, नावगे क्रॉस) यांचा समावेश आहे. या आरोपींकडून १ लाख किमतीच्या जीएम कंपनीच्या ७५ वायर बंडल आणि पिनोलेक्स कंपनीच्या १५ केबल बंडल जप्त करण्यात आल्या आहेत. २,८०,००० किमतीची एक ऑटो, एक धातूच्या शीटची कात्री इत्यादी एकूण ३,८०,००० रुपये किमतीची वस्तू जप्त करण्यात आली आहे.

आरोपींना ओळखून अटक करण्यात बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे पीआय/पीएसआय आणि कर्मचाऱ्यांच्या कामाचे शहर पोलिस आयुक्तांनी कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *