
निपाणी : महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी तालुका व युवा समिती निपाणी यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमांतर्गत निपाणी परिसरातील उच्च प्राथमिक मराठी शाळा इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये मराठी मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी वाळकी, अंमलझरी, पटनकोडी, यमगरणी, बुदीहाल, कोडनी, गायकवाडी या शाळेमध्ये वाटप केले. यावेळी निपाणी तालुका मीडिया खजिनदार नेताजी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आईच्या पोटातून जन्म घेतल्यानंतर जी आई शिकवते ती खरी आपली मातृभाषा आणि त्या भाषेतून शिक्षण घेतल्यामुळे आपल्यामध्ये अनेक पद्धतीचे शिक्षण घेता येते व आपले जीवन अधिक समृध्द होते तरी विद्यार्थ्यानी सरकारी मराठी शाळांमध्ये आपल्या गावच्या मराठी शाळा टिकवून ठेवण्यासाठी पालक विद्यार्थी शिक्षक, शाळा अभिवृद्धी समिती यांनी निःपक्ष पने काम करावे जेणे करून मराठी शाळा विद्यार्थी पट संख्या वाढतील असे केले तर ज्यांनी शिक्षण गरीब मुलांनी घ्यावे म्हणून आपले आयुष्य समर्पित केले अशा महान व्यक्तींना समर्पित होईल. हा अस्तित्वाचा, संघर्षाचा, एक गरीब मुलांनी शिक्षण घेवून उज्वल होण्याचा खरा मार्ग आहे तो मार्ग मोकळा होऊ नये म्हणून प्रत्येक गावातील सर्व सामान्य जनतेने पुढे आले पाहिजे आहे. नको त्याच्या पाठीमागे धावून नवीन काही गावात निर्माण करू शकत नाही जुने मोडले तर कदाचित आपणच जबाबदार आहे याची जाणीव बाळगून सरकारी शाळा वाचवा, असे आवाहन युवा समिती उपाध्यक्ष गणेश माळी यांनी केले. यावेळी उपस्थित दादासाहेब पाटील मुख्याध्यापक शिक्षक, वृंद शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta