Monday , December 8 2025
Breaking News

घरोघरी गंगा-गौरीची आकर्षक आरास

Spread the love

भाजी भाकरीसह पुरणपोळीचा : मंगळवारी होणार गंगा गौरीचे विसर्जन

निपाणी (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या उत्साहात गंगा-गौरीच्या आगमनाने धार्मिक व सांस्कृतिक वातावरण अधिकच उजळले आहे. गणेशाच्या आगमनानंतर दुसऱ्या दिवशी गौरीचे स्वागत करण्यात आले. परंपरेनुसार पहिल्या दिवशी वांगी, भेंडी, दोडका, दिंडका, गवार, शेपू अशा भाज्यांचा भाजी-भाकरीसह नैवेद्य दाखविण्यात आला. दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता.१) घराघरांत पुरणपोळीचा महाप्रसाद गौरीसमोर अर्पण करण्यात आला.

शहरासह ग्रामीण भागात गंगा-गौरीची आकर्षक आरास व सजावट करण्यात आली. रात्री अनेक ठिकाणी झिम्मा, फुगडी, गौरीगीते असा पारंपरिक जल्लोष रंगला.यावेळी सोमनाथ शिंपुकडे व सूरज मांगलेकर यांनी सुंदर आरास केली.

गौरी आगमनामुळे घराघरांत मंगलमय वातावरण निर्माण झाले. अंगणातील तुळशीपासून देवघरापर्यंत रांगोळी काढून लक्ष्मीच्या पावलांचे स्वागत करण्यात आले. अनेकांनी हळद-कुंकू वाहून देवीला वंदन केले. काही घरांमध्ये भांड्यांचा गजर करीत महालक्ष्मीचे आवाहन करण्यात आले. तर काही ठिकाणी लेकींच्या ज्येष्ठा-कनिष्ठा गौरींचे स्वागत साखर वाटून करण्यात आले.

पहिल्या दिवशी गौराईची प्रतिष्ठापना, दुसऱ्या दिवशी महानैवेद्य व हळदी-कुंकवाचा कार्यक्रम, तर तिसऱ्या दिवशी दही-भाताचा नैवेद्य दाखवून विसर्जनाची परंपरा पाळली जाणार आहे. या सर्व उपक्रमांतून भक्ती, आनंद व एकात्मतेचे दर्शन घडत आहे.

About Belgaum Varta

Check Also

इचलकरंजी येथील युवकाचा निपाणी जवळ खून

Spread the love  धारदार शस्त्राचा वापर ; मृतदेह टाकला ओढ्यात निपाणी (वार्ता) : इचलकरंजी येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *