आमदार शशिकला जोल्ले; निपाणीत विविध उपक्रमांनी शिक्षक दिन
निपाणी (प्रतिनिधी) : पहिली गुरु आई असली तरी खऱ्या अर्थाने मुलांना घडविणारे शिक्षकच असतात. आज अनेक जण विविध क्षेत्रात यशस्वी झाले आहेत, त्यामागे शिक्षकांचे योगदान अमूल्य आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या गुरुजनांचा आदर केला पाहिजे, असे प्रतिपादन आमदार शशिकला जोल्ले यांनी केले.
बेळगाव जिल्हा पंचायत, चिक्कोडी शालेय शिक्षण विभाग व निपाणी गटशिक्षणाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनात आयोजित शिक्षक दिन कार्यक्रमात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.
आमदार जोल्ले म्हणाल्या, “शासनाने शिक्षण क्षेत्रात अनेक योजना राबविल्या आहेत. निपाणी सीमा भागात ३०० पेक्षा अधिक शाळा खोल्या उभारण्यात आल्या आहेत. गुरु भावनासाठी आमदार निधीतून २० लाख व जोल्ले उद्योग समूहाकडून ५ लाख, असा २५ लाखांचा निधी देण्यात आला असून पुढील काळातही सहकार्य करू,” असे आश्वासन त्यांनी दिले.
बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे म्हणाले, “समाजबदलाची खरी ताकद शिक्षकांमध्ये आहे. शैक्षणिक सुधारासाठी आ
कार्यक्रम शासकीय पातळीवर असूनही तब्बल ५० पेक्षा अधिक शिक्षक व शासकीय अधिकारी अनुपस्थित राहिल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अनुपस्थित राहिलेल्या शिक्षकांना नोटीस बजावण्याची सूचना त्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना केली.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पांजली व दीपप्रज्वलन करण्यात आले.गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांनी स्वागत केले. नगराध्यक्षा सोनला कोठडी यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर, हालशुगर संचालक राजु गुंदेशा, नगरसेवक जयवंत भाटले, ॲड. संजय चव्हाण, रवींद्र श्रीखंडे, फारुख गवंडी, अरुण आवळेकर, वाय. बी. हंडी, एम. वाय. गोकार, सुरेश कांबळे, नामदेव चौगुले, एस. व्ही. तराळ, एस. एम. पडलाळे, संजीव हुल्लोळी, लक्ष्मी बल्लारी, शिल्पा भुसाणी, अरुणा मुदकुडे, सुनील शेवाळे, बाबुराव मलाबादे, भास्कर स्वामी, सतीश अरभावे, सुनील जनवाडे, आर. ए. कागे यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन एल.ए. कोणे व एस.के. यमकणमरडी यांनी केले.
—
चौकट
सरकारी शाळा बंद पडण्याची भीती
शासकीय शिक्षक सरकारी शाळेत कार्यरत असले तरी स्वतःची मुले खासगी शाळेत शिकवत आहेत. ही पद्धत अनेक वर्षांपासून सुरू आहे. शिक्षकांनी आपली मुले सरकारी शाळेत दाखल केली नाहीत तर शासकीय शाळा बंद पडतील, अशी भीती वीरूपाक्षिलिंग समाधी मठाचे मठाधिपती प्राणलिंग स्वामी यांनी व्यक्त केली.
—
Belgaum Varta Belgaum Varta