निपाणी (वार्ता) : सामान्य कुटुंबातील नागरिकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या मराठा सौहार्द संस्थेने वर्षभरातच ५ कोटी रुपये ठेवींचा टप्पा गाठला आहे. संस्था आणि संचालकावर सर्वसामान्य ठेवीदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळे हे शक्य झाले आहे. ही संस्था नागरिकासाठी असून पुढील काळात शेतकरी, व्यापारी, महिला बचत गट, युवकांना आर्थिक बळ देत स्वावलंबी घडविणे हे ध्येय असल्याचे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी व्यक्त केले. श्री मराठा सौहार्द संस्थेच्या पहिल्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
उपाध्यक्ष ज्ञानेश्वर ढेरे यांनी, संस्थेच्या प्रगतीची नागरिक, अर्जदार आणि ठेवीदारांनी दखल घेतली. सहकार हा फक्त आर्थिक व्यवहार नाही, तर सामाजिक विकासाचा पाया आहे. सामान्य माणसांच्या कष्टातून उभी राहिलेली ही संस्था आज ठेवीदारांच्या विश्वासाने मजबुत होत असल्याचे सांगितले.
यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या प्रगतीत हातभार लावणारे कर्मचारी आणि ठेवीदारांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. पारदर्शक कारभार, विश्वासाचे भांडवल आणि लोकसहभाग या तीन स्तंभांवर उभी राहिलेली ही संस्था पुढील काळात ग्रामीण,शहरी भागात सहकाराची नवी प्रेरणा देणारी ठरणार असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास संचालक बाबासाहेब रामचंद्र तिप्पे, रत्नदीप पानारी आकाश पाटील अतुल चावरेकर, संदीप धनाजी खाडे, कैलास मोरे, अनुजा नाईक, गौरी पाटील, किर्तीकुमार सनदी, व्यवस्थापक सचिन दुर्गे, विजयबाबा निपाणकर, टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष संयोजित उर्फ निकु पाटील, अन्वर बागवान, प्रा. भारत पाटील, अशोक परीट, इरफान महात, नवनाथ चव्हाण, अनिल भोसले, नितीन साळुंखे, इरफान तुरीवाले, दिपक वळीवडे, कृष्णात कुंभार, श्रीनिवास संकपाळ, बबन गोसावी, सुनील हिरुगडे, किरण कोकरे, विश्वास पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta