निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील शरद जंगटे पुरस्कृत ज्ञानज्योती गणेश मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त आयोजित होम मिनिस्टर स्पर्धेत रूपाली हेगळे या विजेत्या ठरल्या. त्यांना नगरसेवक शरद जंगटे व मान्यवरांच्या हस्ते फ्रिज व मानाची पैठणी प्रदान करण्यात आली.
या स्पर्धेत अश्विनी डकरे, सपना चौगुले, सीमा महाजन व रोशनी माने यांना वॉशिंग मशीन, लाकडी कपाट, कुलर, ड्रेसिंग टेबल व मानाची पैठणी देण्यात आली. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या वीस महिलांना पैठणी व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच रिल्स स्पर्धेतील विजेत्या संघांना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार व २ हजार रुपयांची पारितोषिके प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमास बसवज्योती युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद जोले, बिरेश्वर क्रेडिट संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब जोल्ले, निपाणी नगराध्यक्षा सोनल कोठाडीया, जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा डॉ. नीता माने, उद्योजक दिलीप खोत, भारती सातपुते, हालसिद्धनाथ कारखान्याचे संचालक रामगोंडा पाटील, विद्याराणी जंगटे, अनिता चौगुले, मधुमती हिरेमठ, रोहिणी पाटील, माया महाजन, निकिता खेमाने, सारिका पाटील, पद्मश्री पाटील, शकुंतला वाघमोडे, गीता माने, आशा पाटील, सुनंदा देशमुख, महादेवी पाटील यांच्यासह मान्यवर व महिला उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta