निपाणी (वार्ता) : धार, पवार बांधवांना एकत्र आणण्यासाठी निपाणी लवकरच बेळगाव जिल्ह्यासह सीमाभागातील धार पवार समाजबांधवांची व्यापक मेळावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे समाज बांधवांनी संपर्क साधण्याचे आवाहन समाजाचे ज्येष्ठ नागरिक गोविंद पवार निपाणी (रामपूरकर) यांनी केले आहे.
पवार म्हणाले, समाजाचा इतिहास सीमा भागातील पवार बांधवांना समजणे आवश्यक आहे. याशिवाय शासनाच्या विविध सोयी-सुविधा व सवलती मिळविण्यासाठी धार पवार बांधवांनी एकत्र येणे काळाची गरज आहे. महाराष्ट्रासह मध्यप्रदेशमध्ये धार पवार बांधवांची संघटना मजबूत आहे.
महाराष्ट्रात या संघटनेमध्ये चार लाख जणांनी एकत्र येऊन कार्य चालविले आहे. अशाचप्रकारे बेळगाव जिल्ह्यासह निपाणी परिसर व सीमाभागाला लागून असलेल्या महाराष्ट्रातील कागल, मुरगूड, गडहिंग्लज परिसरातील धार पवार बंधूंनी यासाठी एकत्र यावे, यासाठी पहिल्या टप्प्यात धार पवार बंधूंना एकत्र आणण्याचे नियोजन केले आहे. बैठक घेऊन मेळावा घेतला जाणार आहे. त्यासाठी धार पवार बांधवांनी मंगळवार पूर्वी (ता. ३०) डॉ. भालचंद्र पवार (बेळगाव) व निपाणी येथील दत्त सॉ-मिल (मुरगुड-रोड) निपाणी येथे गोविंद पवार निपाणी-रामपूरकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पवार यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta