निपाणी (वार्ता) : येथील महावीर दिगंबर जैन बोर्डिंग ट्रस्ट संचलित श्रीनिकेतन मराठी माध्यम शाळा व शांतिनिकेतन मराठी माध्यम हायस्कूलचे संस्थापक डॉ.चंद्रकांत कुरबेट्टी यांना सहकार रत्न पुरस्कार मिळाला आहे. त्यानिमित्त शांतिनिकेतन हायस्कूलचे अध्यक्ष कपूरचंद इंगळे, डॉ. अनिल ससे, संचालक मिलिंद चौगुले, सेक्रेटरी प्रदीप पाटील आणि शिक्षकातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापिका अलका भोसले म्हणाल्या, सहकाररत्न डॉ. कुरबेट्टी यांनी कोणतेही काम प्रामाणिकपणे केल्यास त्याचे चांगले फळ मिळत असल्याचे सांगितले. डॉ. ससे यांनी, डॉ. कुरबेट्टी हे अनेक वर्षापासून विविध कार्यात सहभागी होत आहेत. शिवाय त्यांची कामगिरी यशस्वी झाल्याचे सांगितले.
निपाणी विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये योगा व ४०० मीटर धावण्यात हायस्कूलची विद्यार्थिनी शेजल खाडे हिने प्रथम व तृतीय क्रमांक पटकावून तालुका स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. सीआरसी पातळीवरील क्रीडा स्पर्धेत गोळा फेकमध्ये मधुर चव्हाण याने तृतीय क्रमांक पटकावला, ४००×२०९ रिले धावण्यात मधुर चव्हाण, राजवीर मोरे, संग्राम माने, अथर्व शिंदे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. खो खो स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून तालुका स्पर्धेसाठी पात्र ठरलेले आहे या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
जितेंद्र कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. कुलकर्णी यांनी आभार मानले.
—-
Belgaum Varta Belgaum Varta