

निपाणी (वार्ता) : पालकमंत्री सतीश जारकीहोळी, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, चिक्कोडी जिल्हा उपाध्यक्ष रोहन साळवे, निपाणी ब्लॉक अध्यक्ष राजेश कदम, सुजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली अस्लम शिकलगार यांची निपाणी ब्लॉक अल्पसंख्याक अध्यक्षपदी निवड करण्यात आली. येथील मराठा मंडळमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांना या निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी शिकलगार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बाळू लोहार यांची निपाणी ब्लॉक काँग्रेस ओबीसी सेल्स अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
लक्ष्मण चिंगळे यांनी, पद हे फक्त स्थान नसून नागरिकांची काम करण्याची जबाबदारी आहे. पक्षाची ध्येय–धोरणे लोकांपर्यंत पोहोचवणे हीच खरी ताकद असल्याचे सांगितले. शिकलगार यांनी निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्या पुढील काळातही काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी कार्यरत राहण्याची ग्वाही दिली.
यावेळी निपाणी टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील, निपाणी ब्लॉक उपाध्यक्ष अन्वर हुक्केरी, शहर युवा अध्यक्ष सैफ पटेल, गणी पटेल, माजी नगराध्यक्ष विजय शेटके, गजेंद्र पोळ, किरण कोकरे, विश्वास पाटील, झाकीर कादरी, नंदकुमार कांबळे, संदीप चावरेकर, नगरसेवक अरुण आवळेकर, रवींद्र श्रीखंडे, ॲड. संजय चव्हाण, अब्बास फरास, शरीफ बेपारी, जावेद कोल्हापुरे, कासिमखान पठाण, सु टिपु सनदी, शौकत बागवान, अस्लम चावलवाले, समीर सय्यद, अताउल्लाह जमादार राजू नाईक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta