

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेबांच्या उरुसानिमित्त शर्यती कमिटीतर्फे शनिवारी (४ ऑक्टोबर) सकाळी अंमलझरी रस्त्यावरील आंबेडकर नगरात विविध शर्यती पार पडल्या. त्यामधील विना लाठी-काठी जनरल बैलगाडी शर्यतीत निपाणीच्या सचिन काटकर यांचा बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावून १० हजार १ रुपये आणि निशान मिळवले.
या शर्यतीत अक्कोळच्या अमोल सदावर्ते यांच्या बैल जोडीने द्वितीय क्रमांकाचे ७ हजार १ रुपये आणि निशाण तर आडी येथील राजू पोकळे यांच्या बैलजोडीने तृतीय क्रमांकाचे ४ हजार १ रुपये आणि निशाण मिळवले. जनरल घोडागाडी शर्यती मध्ये विकास कांबळे, निपाणी बेगम आणि शिवाजी कांबळे (सर्व निपाणी) यांनी अनुक्रमे प्रथम ते तृतीय क्रमांकाची ७ हजार १, ५ हजार १, आणि ३ हजार १ रुपये, जनरल घोडा-बैलगाडी शर्यतीमध्ये सोहेल भैया (नेर्ली), अनिकेत पाटील (बुदिहाळ) आणि पन्नू गुरव (मुरगुड) यांच्या गाड्यांनी अनुक्रमे प्रथम ते तृतीय क्रमांकाची ७ हजार१, ४ हजार १ आणि २ हजार १ रुपयांची बक्षिसे पटकावली.
संग्रामसिंह देसाई -सरकार यांच्या हस्ते शर्यतीचे उद्घाटन झाले. उरूस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब देसाई, संजय माने, जयराम मिरजकर व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी प्रभाकर पाटील, रणजीतसिंह देसाई- सरकार, किरण पाटोळे, संभाजी मुगळे, आतिश शिंदे, विश्वास माळी, आनंद लोकरे, सुजित गायकवाड, राजकुमार मेस्त्री, अविनाश शिंदे, श्रीकांत माळगे, धर्मा कांबळे, इंद्रजीत कांबळे, धनाजी कांबळे यांच्यासह उरुस, शर्यती कमिटीचे पदाधिकारी आणि शर्यती शौकीन उपस्थित होते. संजय कुरणे यांनी सूत्रसंचालन केले.
Belgaum Varta Belgaum Varta