Monday , November 10 2025
Breaking News

बोरगाव शर्यतीत संतोष हवले यांची घोडागाडी प्रथम

Spread the love

 

शरद जंगटे फाउंडेशनतर्फे आयोजन; इचलकरंजीची घोडागाडी द्वितीय

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील नगरसेवक आणि हाल शुगरचे संचालक शरद जंगटे फाउंडेशनतर्फे दसरा सणानिमित्त विविध शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. जनरल घोडा-गाडी शर्यतीमध्ये बोरगाव येथील संतोष हवले यांच्या गाडीने प्रथम क्रमांक मिळवून ५ हजार १ रुपयांचे बक्षीस पटकावले.
नगरसेवक शरद जंगटे, अभियंता राजू हिरेमठ, बी.के. महाजन, उत्तम कदम, बबन रेंदाळे, अजित तेरदाळे, दर्शन चौगुले, संतोष हवले, अमोल निकम व मान्यवरांच्या हस्ते शर्यती मैदान पूजन आणि उद्घाटन करण्यात आले.
जनरल घोडा- गाडी शर्यतीमध्ये इचलकरंजीचा फँट्या यांची घोडा-गाडी द्वितीय क्रमांक पटकावून ३ हजार १ रुपयांचे तर बोरगाव येथील खंड्या ग्रुप लगमन यांच्या गाडीने तृतीय क्रमांक पटकावून २ हजार १ रुपयांचे चे बक्षीस मिळविले.
जनरल घोडा- बैलगाडी शर्यतीमध्ये निम शिरगावच्या सोनू दानोळी यांच्या गाडीने प्रथम क्रमांक, बोरगाव येथील अक्षय मोळे यांनी गाडीने द्वितीय क्रमांक आणि कुंभोज येथील अभिजीत कोले यांनी गाडीने प्रथम ते तृतीय क्रमांक मिळवला. त्यांना अनुक्रमे ५ हजार १, ३ हजार १ आणि २ हजार १ रुपयांची बक्षिसे देण्यात आली.

बिनदाती घोडा-बैलगाडी शर्यतीमध्ये अक्षय मोळे -अब्दुललाट, पोपट दत्तवाडे, आणि गुरु मोरे -रांगोळी यांच्या गाड्यांनी प्रथम ते तृतीय क्रमांक पटकावला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते अनुक्रमे ३००१, २००१, आणि १००१ रुपयांची बक्षिसे देण्यात आली. यावेळी नगरसेवक शरद जंगटे, राजेंद्र हिरेमठ, बी.के. महाजन, जितू पाटील, फिरोज अफराज, अमोल पाटील, दर्शन चौगुले, महावीर पाटील, बबन रेंदाळे, शंकर गुरव, सचिन कोळी, उत्तम कदम, भरत कांबळे, भरत पाटील, अजित कांबळे, इलीयास कापशे, अमोल निकम, सुभाष निकम, भारत महाजन संजय महाजन, सर्जेराव धनवडे, शितल सोबाने, अभिजित शिंगे यांच्यासह परिसरातील शर्यतीशौकीन उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रति टन केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येकी हजार रुपये मिळावेत

Spread the love  राजू पोवार ; कर्नाटकच्या निर्णयानंतर आनंदोत्सव निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील ऊसाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *