

विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी शौर्य प्रशिक्षण वर्ग
निपाणी : श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ येथेविश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी शौर्य प्रशिक्षण वर्ग शनिवारी सायंकाळी सुरू झाले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प.पू. प्राणलिंग स्वामीजी तसेच मातृशक्तीच्या उपाध्यक्ष सुचिता ताई कुलकर्णी व दुर्गा वहिनीच्या प्रमुख श्वेता ताई हिरेमठ यांच्या हस्ते भारत मातेची पूजन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली.
यावेळी प. पू. प्राणलिंग स्वामीजी यांनी उद्घाटन समारंभात बोलते वेळी म्हणाले की, आपल्या भारतीय संस्कृतीत मुलींना देवतेचे रूप मानले आहे पण आजच्या युगात तरुणीने देवतेंची फक्त उपासना न करता देवतेनी ज्याप्रमाणे राक्षसाच्या वध केला त्याचप्रमाणे आजच्या तरुणीने वाईट गोष्टी, त्याग करायला हवा तसेच अत्याचार करण्याच्या कडाडून विरोध केला पाहिजे प्रसंगी कालिमतेचे, दुर्गा देवाचे रूप घेऊन अशा नराधम राक्षसाच्या नायनाट केला पाहिजे. यावेळी प. पू. प्राणलिंग स्वामीजी यांनी अशी शिबिरे गावागावात घेतली पाहिजे असे आवाहन केले.
यावेळी शिबिरामध्ये लाठी- काठी, कराटे, तलवार बाजी, योगा, प्राणायाम, शारीरिक व्यायाम तसेच विविध खेळ घेतले जाणार आहे. तसे राजलक्ष्मी आमने यांची वर्ग शिक्षिका म्हणून नेमणूक केली आहे तर माने ताई, दीपक भडगावे, सुरेश भानसे, सतीश पाटील, पपू पाटील, युवराज पाटील, आकाश स्वामी, यांनी हे शिबिर यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta