

बेळगाव : टिळकवाडी येथील सुभाषचंद्रबोस लेले मैदानावर टिळकवाडी सार्वजनिक शिक्षण खात्याच्या विभागीय स्तरीय प्राथमिक मुला मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत उद्घाटनच्या दिवशी बेळगांव, चिकोडी, बागलकोट यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.
सकाळी 10.00 वाजता स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून
जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ, जिल्हा शारीरिक शिक्षणाधिकारी जुनेद पटेल, उद्योजक के आर शेट्टी स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष प्रणय शेट्टी, शिवाजी कॉलनी फुटबॉल क्लब अध्यक्ष राकेश कांबळे, सचिव पवन कांबळे, उद्योजक मच्छिंद्र भोसले, मोनाप्पा पाटील, संत मीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उमेश दप्तरदार, पीईओ जहिदा पटेल, साधना बद्री, टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेचे सचिव प्रवीण पाटील, कॅम्प विभागाचे अध्यक्ष नागराज भगवंतण्णावर, शहर प्राथमिक शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रमेश सिंगद, भरत बळ्ळारी, चंद्रकांत पाटील, पुनित शेट्टी, प्रसन्ना शेट्टी आदी मान्यवराच्या हस्ते भारत माता फोटो पूजन दीप प्रज्वलन श्रीफळ वाढवून व खेळाडूंची ओळख करून तसेच फुटबॉल चेंडूला किक मारून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी पंच मानस नायक, उमेश मजुकर, हर्ष रेडेकर, रामलिंग परीट, संतोष दळवी, उमेश बेळगुंदकर, अनिल जनगौडा, अनिल गोरे, विजय रेडेकर, उपस्थित होते. या स्पर्धेत या स्पर्धेत बेळगाव, गदग, हावेरी, धारवाड, विजयपुरा, बागलकोट, चिकोडी, शिरसी, कारवार येथील प्राथमिक मुला मुलींच्या संघानी सहभाग घेतला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta