Friday , March 6 2026
Breaking News

निपाणी परिसरात शेतकरी बांधवातर्फे भूमी पौर्णिमा उत्सव साजरा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : दसऱ्यानंतर शेतकरी बांधव भूमिपूजनाचा उत्सव साजरा करतात. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता.८) हा कार्यक्रम पार पडला. सकाळी आठ वाजल्यापासूनच या कार्यक्रमाची शेतकऱ्याकडून तयारी सुरू झाली होती. वर्षभर अन्न पुरवणाऱ्या भूमी मातेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आले.
आधुनिकतेच्या युगातही शेतकरी अजूनही त्यांच्या शेतांवर अवलंबून आहेत. भूमी पूजन म्हणजे अन्न देणाऱ्या भूमीचा सन्मान करून शेतकऱ्यांनी हा सण साजरा केला. भूमी पूजा ही प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. वर्षभर दिलेल्या पिकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या आणि भविष्यात भरपूर पिके मिळावीत अशी प्रार्थना शेतकऱ्यांनी केली. याशिवाय पुरणपोळी, भाज्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला. तर दसरा दिवशी लुटलेले सोने जमिनीत काढण्यात आले. शेतकऱ्यांचे निसर्गाशी असलेले नाते या उत्सवातून उलघडण्यात आले.यावेळी शेतात फुले आणि फुल झाडे सजवून नैवेद्य अर्पण करण्यात आला. पूजेनंतर शेतकरी बांधव आणि मित्रांनी शेतात बसून जेवणाचा आस्वाद घेतला.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव के. एस. पाटील हायस्कूलमध्ये दहावी विद्याथ्यर्थ्यांचा सदिच्छा समारंभ

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील बोरगाव शिक्षण संघाच्या के. एस. पाटील माध्यमिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *