

निपाणी (वार्ता) : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य आणि त्यासाठी धारातीर्थ पडलेले मावळे, गडकोट, स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास अजरामर रहावा, त्याची माहिती युवा पिढीला मिळावी, त्या उद्देशाने येथील श्री राम सेना हिंदुस्थान संघटनेतर्फे सलग ७ व्या वर्षी तालुका स्तरीय दुर्गबांधणी (किल्ला) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे प्रथम ते पाचव्या क्रमांकासाठी १० हजार १ रुपये,७ हजार १ रुपये, ५ हजार १ रुपये, ३ हजार १ रुपये आणि १ हजार १ रुपये अशी ५ बक्षिसे देण्यात येणार आहेत.
याशिवाय उत्कृष्ट माहिती सादरीकण करणाऱ्या मंडळाला १ हजार एक रुपये,
उत्कृष्ट वातावरण निर्मितीसाठी १ हजार २१ रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच सर्व विजेत्यांना आणि सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.स्पर्धेसाठी २५ ऑक्टोबर ही नाव नोंदणीसाठी अंतिम मुदत आहे. अधिक माहीतीसाठी कोठीवाले कॉर्नर वरील
आर. एल. आंबले हार्डवेअर (श्रेयश आंबले), केएलई कॉलेज समोरील
साई झेरॉक्स (साईनाथ खोत), चन्नम्मा सर्कल मधील औंधकर सायकल दुकान (सुजल औंधकर) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
श्री मराठा सौहार्दतर्फे किल्ला स्पर्धा
निपाणी येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी चौकातील श्री मराठा सौहर्द सहकारी संस्थेतर्फे ‘श्री मराठा किल्ला स्पर्धा २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा निपाणी शहर मर्यादित असून छत्रपती शिवाजी महाराजांचा महारांजांचा इतिहास व गड किल्ल्यांची माहिती व्हावी, याउद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर ढेरे आणी संचालक मंडळाचे मार्गदर्शन लाभत आहे. परिक्षक म्हणून देवचंद महाविद्यालयाचे प्रा. डॉ. भरत पाटील, दिपक वळिवडे हे काम पाहणार आहेत. विजेत्यांना रोख रक्कमेची बक्षीसे दिली जातील. स्पर्धेतील सर्वोकष्ट किल्ल्यास ‘दुर्गराज’ हा मानाचा किताब देण्यात येईल. स्पर्धेत सहभाग घेणाऱ्यानी आपल्या प्रवेशिका मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकातील
श्री मराठा सौहार्द सहकारी सारखे मधून घेऊन जाणे आवश्यक आहे. नावे नोंदविण्याची अंतिम मुदत २८ ऑक्टोबर असून अधिक माहितीसाठी प्रा. डॉ. भरत पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta