Sunday , July 26 2026
Breaking News

खासदार जगदीश शेट्टरांनी मराठी भाषिकांवर ओकली गरळ!

Spread the love

 

बेळगाव : एक नोव्हेंबर हा राज्योत्सव दिन असल्याने या दिवशी कोणीही काळा दिन आचरणात आणू नये तर कर्नाटक राज्यातील सर्वांनीच एक नोव्हेंबर हा राज्योत्सव दिन म्हणून साजरा करावा अशी गरळ ओकली.

मराठी भाषिकांच्या मतांवरच निवडून येऊन खासदारकी भूषवणाऱ्या खासदार जगदीश शेट्टर यांनी आपला मराठी द्वेष्ट्येपणा दाखवून दिला आहे. सीमाभागातील मराठी भाषिक महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली पाळत असलेल्या काळ्या दिनाला विरोध करत महाराष्ट्र एकीकरण समितीवर तोंडसुख घेतले आणि मराठी भाषिकांना काळा दिन पाळायचाच असेल तर महाराष्ट्रात जाऊन पाळावा, असा तुघलकी सल्ला देखील दिला व महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावात द्वेष निर्माण करत असल्याचे सांगितले.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आवाहनाला मराठी भाषिकांचा पाठिंबा नाही असे सांगत समितीने बेळगावमध्ये मराठी व कन्नड वाद निर्माण केल्याचा आरोप देखील यावेळी केला. सीमा प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे त्यामुळे निकाल येईपर्यंत वाट बघावी असे सांगत महाजन अहवालाचे तुणतुणे देखील त्यांनी वाजविले आणि महाजन अहवालानुसार महाराष्ट्रातील सोलापूर, जत हा भाग कर्नाटकात सामील करावा, अशी मागणी केली. मराठी भाषिकांच्या मतावर निवडून येऊन मराठी अस्मितेलाच विरोध केल्याबद्दल जगदीश शेट्टर यांच्यावर जोरदार टीका होत असून हिंदुत्वाच्या नावाखाली राष्ट्रीय पक्षांच्या आहारी गेलेल्या मराठी माणसाने आता तरी जागे व्हावे अशी भावना मराठी भाषिकातून व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *