

विश्व हिंदू परिषद आणि गोरक्षण सेवा समितीकडून संकलन
गोरक्षण आणि गोसवर्धन करणे ही काळाची गरज-सुरेश भानसे विश्व हिंदू परिषद अध्यक्ष
विश्व हिंदू परिषद कडून समाधीमठ गोशाळाला पूजेच्या ५ टन ऊस अर्पण निपाणीतील व्यापाऱ्यांना गोरक्षण सेवा समिती कडून केलेल्या आव्हानाला व्यापारी वर्गाकडून मोठ्या प्रतिसाद मिळाला. शहरामधील प्रत्येक व्यापारी, व्यावसायिक दिवाळीनिमित्त आपल्या दुकानात लक्ष्मीपूजन आणि सजावटीसाठी उसाचा वापर करतात.
यावेळी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि गोरक्षण सेवा समिती निपाणी यांच्याकडून समाधीमठ गोशाळेसाठी ऊस देण्याचे आवाहनाला निपाणीतील व्यापारी वर्गाला केले होते. त्याला प्रतिसाद देत ५ टनापेक्षा अधिक ऊस समाधीमठ गोशाळेला निपाणी व्यापारी वर्गाकडून अर्पण करण्यात आला, असे विश्व हिंदू परिषदचे अध्यक्ष सुरेश भानसे यांनी सांगितले.
यावेळी प.पू. प्राणलिंग स्वामीजी बोलते वेळी म्हणाले की, भारतीय संस्कृतीत गोमातेला पवित्र मानते जाते गोमतेच्या मानवी जीवनाला अनेक मार्गाने उपयोग होतो म्हणून गाईला गोमाता म्हणून संबोधले जाते. पण आज हिंदू त्यापासून दूर होत चालला आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास भविष्यात गाय पुढच्या पिढीला चित्रात दाखवावी लागेल गायीचे संगोपन करणे ही काळाची गायीचे आहे आयुर्वेदात गाईला महत्वाचे स्थान आहे. जर घरी गाय असेल तर त्यांना कोणताच त्रास होणार नाही घरातील वातावरण सात्विक राहते. घरो घरी गायी सांभाळल्या पाहिजेत. त्यासाठी जागृती होने देखील तितकेच महत्वाचे आहे. गायीची सेवा करणे सर्वश्रेष्ठ आहे. तरुणांनी सणाच्या महत्वाच्या दिवशी गोमतेच्या सेवेला प्रधान्य देऊन ऊस गोळा केला. ही
अभिमानस्पद गोष्ट आहे. यंदा ही चाऱ्याची टंचाई होणार आहे. पण असे तरुण आणि संघटना समाजहितासाठी काम करणारे असतील तर आपण कोणत्याही संकटाचा सामना करू शकतो, त्यांचा आदर्श इतर तरुणांनी घ्यावा असे मत यावेळी श्री विरूपाक्षलिंग समाधी मठचे प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांनी केले. गोरक्षण सेवा समिती निपाणीचे प्रमुख सागर श्रीखंडे म्हणाले, ‘वसुबारसनिमित्त शेकडो हिंदूंनी सोशल मीडियावर, समाजमाध्यमांद्वारे, शुभेच्छा दिल्या. पोस्ट केल्या; पण गोरक्षण, गोसंवर्धन, गोसेवा करण्यासाठी कृती दिसत नाही ही हिंदूंची शोकांतिका आहे. हिंद तरुणांनी केवळ फेसबुक, व्हाट्सअप, इन्स्टा, रिल्स या सोशल मीडिया गोमातेवरील प्रेम व्यक्त करून चालणार नाही तर त्यासाठी प्रत्येकाने कृतीतून आचरणातून प्रत्येकाने गोरक्षण, गो संवर्धन आणि गोसेवा साठी पुढे आले पाहिजे, ज्यांना गोमातेसाठी सेवा करायची असेल किंवा सहकार्य करायचे असेल त्यांनी समाधी मठ गोशाळेला भेट द्यावी अथवा गोरक्षण सेवा समिती यांना संपर्क करावे.
यावेळी परिसरातील तरुणांनी केलेल्या या उपक्रमाचे निपाणी परिसरातून कौतुक होत आहे. निपाणी समाधी मठ गोशाळेला व्यापारी वर्गाकडून पूजेचे ऊस व साहित्य गोळा करताना विश्व हिंदू परिषदचे अध्यक्ष सुरेश भानसे, भीमराव पिसुत्रे, बजरंग दलचे अनिकेत फडतरे, आकाश स्वामी वारकरी संप्रदायाचे अक्षय सूर्यवशी तसेच उदय पाटील, संजय कांबळे, अभिमन्यू भिलुगडे, अक्षय स्क्ताडे, पांडुरंग यांनी ऊस गोळा करून दिला तर हा ऊस वाहतूक करण्यासाठी स्वस्तिक ट्रेडर्स एचपी गॅस यांच्याकडून वाहन मोफत उपलब्ध करून दिले या उपक्रमासाठी निपाणी येथील प्रसिद्ध उद्योजक प्रवीण तारळे याचे विशेष सहकार्य लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta