सौंदलगा : येथील सरकारी मराठी शाळेत चौथी शाळा अभिवृध्दी देखभाल समितीचे एकदिवशीय शिबीर खेळीमेळीत पार पडले. प्रारंभी रोपाला पाणी देऊन कार्यशाळेचे प्रशिक्षणार्थीनी उद्घाटन केले. स्वागत आणि प्रस्तावना संपन्नमुल अधिकारी कटगेरी यांनी केली. यावेळी लॉर्ड बॅडेण पॉवेल यांच्या प्रतिमेचे मान्यवरांचे हस्ते पुजन करण्यात आले. मा. मुख्याध्यापक धनंजय ढोबळेनी लॉर्ड पॉवेल यांचा जीवनवृतांत सर्वांच्यासमोर आपल्या मनोगतातून मांडला आणि स्काऊट विषयी माहिती दिली. प्रशिक्षकांनी एन. ई. पी, एस. ओ. पी. आणि शाळा बाह्यमुले, दिव्यांग मुले शाळेच्या प्रवाहात कशी आणता येतील याविषयी चर्चा करण्यात आली.
प्रशिक्षक वीणा महेंद्रकर, विनय भोसले, एस. बी. हडकर, संतोष हालसवडे यांनी चेंडू बकेटचा मनोरंजनात्मक खेळ घेतला. एस.डी.एम.सी.चे अध्यक्ष शंकर कदम, आरीफ मुल्ला, दतात्रय बोरगावे, वासू भानसे, बिरू कोगनोळे, एम. आर. कांबळे, सुशांत मारुती वंदुरे पाटील, राजेंद्र साळुंखे, विठ्ठल साठे, सचिन पाटील, सायगौंड धुपदाळे, आर. व्ही. सरनाईक, अजित कांबळे, शिवाजी हतकर, प्रियांका कोळी, तसेच मुख्याध्यापिका एस. एस. मगदुम, सुजात्ता मेस्त्री, आर. व्ही. सरनाईक, मुख्याध्यापक अजित गोरवाडे, एस. आय. मुल्ला, एम. आर. कांबळे, जबडे आणि असंख्य शिक्षक/शिक्षिका पालक, विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचलन अनिल शिंदेनी तर आभार प्रकाश पवार सरांनी मानले.
Check Also
तवंदी घाटात भीषण अपघात: एकाचा मृत्यू, १५ गंभीर जखमी
Spread the love बेळगाव : पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात भरधाव वेगात आलेल्या …