
कारखाने सुरू करू देणार नाही : राजू पोवार यांचा कारखानदारासह सरकारला इशारा
निपाणी (वार्ता) : अतिवृष्टी, महापुर, विविध रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना ऊस पिक घेण्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे. खर्चाच्या तुलनेत यंदाच्या हंगामात प्रतिटन ३५०० रुपये दर जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू देणार नसल्याचा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी कारखानदारासह शेतकऱ्यांना दिला. शुक्रवारी (ता.३१) पुणे -बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी येथील घाटाच्या उताऱ्यावर रयत संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व ऊस उत्पादकांनी सुमारे पाऊन तास रास्ता रोको करून एल्गार केला. त्यावेळी राजू पोवार बोलत होते.
राजू पोवार यांनी, गेल्या चार वर्षात सोन्या चांदीचा दर लाखो रुपयावर गेला आहे. पण वर्षानुवर्षे ऊस पिकूनही शेतकऱ्यांना आहे तोच दर का दिला जातो? असा प्रश्न विचारून या पुढील काळात शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव न दिल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नसल्याचे सांगितले.
यावेळी डेप्युटी तहसीलदार मृत्युंजय डंगी, पोलीस उपाधीक्षक गोपाळकृष्ण गौडर, निपाणी मंडल पोलीस निरीक्षक बी.एस. तळवार यांच्यासह निपाणीतील तीन पोलीस निरीक्षक, चिकोडी येथील निरीक्षकांनी बेडकिहाळ आणि शिवशक्ती येथील सुरू असलेले कारखाने बंद केले. शिवाय सायंकाळी पाच वाजता गुर्लापूर येथे साखर कारखान्याचे संचालक, कारखान्याचे कार्यकारी संचालक, शेतकरी संघटनेच्या प्रमुखांची बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार सांगितले.
रास्ता रोकोमध्ये दत्ता लाटकर, मुरुगा कल्याणशेट्टी, बाबासाहेब पाटील, कालगोंडा कोटगे, सुभाष चौगुले, सुभाष खोत, सागर नलावडे, विजय मंगावते, सागर हल्ल्याळ, सर्जेराव हेगडे, बबन जामदार, एकनाथ सादळकर, महादेव शेळके, बाबासाहेब कुंभार, बाळकृष्ण चेंडके, तानाजी पाटील, सुनील पाटील, सागर पाटील, पिंटू कांबळे, चिनू कुळवमोडे, शिवाजी वाडेकर, पिंटू लाड, मयूर पोवार, राजू चौगुले, महादेव साळुंखे, पवन माने यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta