Monday , September 21 2026
Breaking News

खा. धैर्यशील माने, विजय देवणे, संजय पवार यांना बेळगावात प्रवेशबंदी!

Spread the love

 

बेळगाव : एक नोव्हेंबर राज्योत्सव दिनाच्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काळा दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हातकणंगलेचे खासदार तसेच तज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नेते विजय देवणे, संजय पवार यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेश बंदी केली आहे. बेळगावात भाषिक तेढ निर्माण होऊ नये त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे. भारतीय नागरी संरक्षण संहिता कलम 163 अंतर्गत हा आदेश लागू करण्यात आला आहे.

कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगावसह सीमा भागात होणाऱ्या एक नोव्हेंबर काळ्या दिनी मूक फेरीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील हातकणंगलेचे खासदार तसेच तज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नेते विजय देवणे, शिवसेना नेते संजय पवार, ग्रामीण प्रमुख सुनील शिंत्रे, शहर प्रमुख सुनील मोदी यांच्यासह कोल्हापूर येथील शिवसेना संघटनेशी संलग्न असणाऱ्या सुमारे 25 कार्यकर्त्यांना उद्या एक नोव्हेंबर रोजी बेळगाव गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. विजय देवणे यांनी एक नोव्हेंबर रोजी सीमावासीयांना पाठिंबा देण्यासाठी निपाणी मार्गे बेळगावात येऊन काळ्यादिनाच्या आंदोलनात सहभागी होण्याची घोषणा केली होती या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी 31 ऑक्टोबर रोजी हा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला असून महाराष्ट्रातील नेत्यांना एक नोव्हेंबर रोजी बेळगाव जिल्ह्यात बंदी घालण्यात आली आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या शिफारसीवरून भारतीय नागरी संरक्षण संहिता कलम 163 अंतर्गत हा आदेश लागू करण्यात आला असून राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडू नये तसेच भाषिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट नमूद केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *