
डॉ. कपिल राजहंस; निपाणीत कार्यकर्त्यांची चिंतन बैठक
निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरात मानवी उत्थानाच्या अनेक चळवळी आंदोलने झाली. या भागात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह अनेक महापुरुषांचा पदस्पर्श झाला आहे. त्यांच्या विचाराचा वसा म्हणून गेली २९ वर्षे शिवराय ते भिमराय ही विचारधारा घेऊन निपाणी परिसराला फुले, शाहू, डॉ. आंबेडकर विचार संमेलनाच्या माध्यमातून सातत्याने सर्वसमावेशक समाजाचे प्रबोधन करून परिसरात परिवर्तनवादी चळवळ जिवंत ठेवण्याचे ऐतिहासिक काम डॉ. आंबेडकर विचार मंचने केले आहे, असे मत इतिहास संशोधक डॉ. कपिल राजहंस यांनी व्यक्त केले ते डॉ. आंबेडकर विचार मंच तर्फे येथील पंत नगरात आयोजित संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या चिंतन बैठकीच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते थोर राष्ट्रपुरुषांच्या प्रथमेश चे पूजन झाले. प्रमोद कांबळे यांनी स्वागत तर प्रा.सुरेश कांबळे यांनी प्रास्ताविक केले.
ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. अच्युत माने यांनी, सध्याच्या भ्रष्ट राजकीय व्यवस्थेमध्ये तरुणांनी अडकून न पडता स्वतः च्या प्रगतीचा मार्ग शोधावा. तरच आपली प्रगती निश्चित असल्याचे सांगितले.दलित नेते मल्लेश चौगुले यांनी, समाजाला राजकारणात गुंतवून ठेवून राजकीय लोक स्वतःचा स्वार्थ साधक आहेत. तरुणांनी रोजगाराच्या विविध संधी निर्माण करून आपल्या प्रगतीच्या वाटा शोधण्याचे आवाहन केले.
यावेळी चित्रपट दिग्दर्शक अनुप जत्रटकर उद्योगपती तानाजी सावर्डेकर, डॉ. संभाजी कुर्लीकर, भिकाजी कांबळे, विद्या अमित शिंदे, हर्षल ढोबळे यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. एन. डी. जत्रटकर, डॉ. आर. पी. कांबळे, विजय मेत्राणी, प्रा.अनिल मसाळे, मिथुन मधाळे, संदीप कांबळे, महेश धम्मरक्षित यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस निपाणी सह ग्रामीण भागातील मंचचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दीपक शेवाळे यांनी आभार केले.
Belgaum Varta Belgaum Varta