
फिरोज अफराज; नगर खाण्यासाठी आमदार जोल्ले दांपत्यांचे प्रयत्न
निपाणी (वार्ता) :बोरगाव येथील ग्रामदैवत हजरत पीर बावा ढंग वली व हैदरसा मदरसा यांच्या दर्ग्याचा उरूस शुक्रवार (ता.६ )ते रविवार ( ता.९) अखेर होणार आहे. त्यानिमित्त दर्गा परिसरातील प्रवेशद्वाराजवळ आमदार शशिकला जोल्ले व डीसीसी बँकचे नूतन संचालक आणि माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून ४५ लाख रुपयांच्या अनुदानातून सुसज्ज अशी नगारखान्याची नूतन वास्तू बांधली आहे. या वास्तूचा लोकार्पण सोहळा होणार असल्याची माहिती बोरगाव येथील मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते फिरोज अफराज यांनी दिली. दर्गा परिसरातील वास्तू पाहणी दरम्यान बोलत होते.
फिरोज अफराज म्हणाले, दोन वर्षापूर्वी अण्णासाहेब जोल्ले आणि शशिकला जोल्ले यांच्याकडे नगारखाना बांधकाम साठी एक लाख रुपये अनुदानाची मागणी केली होती. त्यांनी तात्काळ बोरगाव नगरपालिकेतील प्रभाग १ मधील नगरसेवक शरद जंगटे यांच्याशी चर्चा करून नगरखाना बांधकामसाठी शासनाकडून ४५ लाख रुपये मंजूर केला होता. याशिवाय जोल्ले यांनी बोरगाव मुस्लिम समाजासाठी शादी महाल, कब्रस्तान संरक्षक भिंत, सुसज्ज व्यापारी गाळे, दर्गा परिसरातील काँक्रीट रस्ता, नगारखाना अशी विविध लोकोपयोगी कामे करून मुस्लिम समाजाची प्रगती साधण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.
यावेळी हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक, नगरसेवक शरद जंगटे, बी. के. महाजन, बबन रेंदाळे, महावीर पाटील, संजय महाजन, मुजावर कमिटीचे आप्पालाल मुजावर, शब्बीर मुजावर, महिपती खोत, राजू कुंभार, सर्जेराव धनवडे यांच्यासह दर्गा परिसरातील मुजावर बांधव उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta