
भटजी ऐवजी मोबाईल वरील मंगलाष्टिका
निपाणी (वार्ता) : विवाह इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून तुळशी विवाहाची प्रतीक्षा केली. अखेर सोमवारी (ता.३) सायंकाळी गोरज मुहूर्तावर मोबाईल वरील मंगलाष्टीकेवर निपाणी आणि परिसरात तुळशी विवाहाचा बार उडवून दिला. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करून प्रसादाचे वाटप करण्यात आले.
सायंकाळी पाच वाजलया पासून घरोघरी महिलांची तयारी सुरू झाली होती. घराच्या अंगणात असलेल्या तुळशी कट्टा परिसरात आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या होत्या. काही कुटुंबांनी नवीन आणून त्याची पूजा केली. अंगणात सडा घातल्याने घराचा परिसर उठावदार दिसत होता. प्रत्येकांच्या दारामध्ये तोरणे, पताके व फुलांनी सजावट करण्यात आली होती. कुटुंबातील मुलगी समजूनच तुळशीला सजविण्यात आले. तुळशी विवाहासाठी उसव केळीच्या पानांचा मंडप तयार केला करण्यात आला होता. पाटावर आसन टाकून त्यावर तुळस व मूर्तीची प्रतिष्ठापना युवती आणि महिलांच्या हस्ते करण्यात आली. सायंकाळी सहा वाजताच गोरज मुहूर्तावथ अक्षता टाकण्यासाठी सर्वप्रथम विघ्नहर्ता गणरायाची पूजा करण्यात आली.
काही ठिकाणी विड्याच्या पानांची वर म्हणून पूजा केली, तर बाळकृष्णाची मूर्ती आणि तुळशीच्या मध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणत विवाह लावण्यात आले. विवाह संपन्न झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. प्रसाद म्हणून दिवाळी फराळ, लाह्या- बत्तासे, खजूर, उसाचे वाटप झाले. रात्री उशिरापर्यंत तुळशी विवाह सोहळा प्रत्येक गावात रंगला होता. आता यापुढील पाच दिवसाच्या काळात हे सोहळे सुरूच राहणार आहेत. त्यानंतर गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या वधू वर पित्यांची विवाह लावून देण्यासाठी धडपड सुरू होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta