
विविध कार्यक्रम, शर्यतींचे आयोजन ; सिकंदर अफराज यांची माहिती
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील हजरत हजरत पीर बावाढंगवली आणि हजरत पीर हैदरशा मदरशा उरुससाला गुरुवार (ता.६) प्रारंभ झाला आहे. सोमवार (ता.१०) अखेर विविध धार्मिक कार्यक्रम, शर्यतीसह मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती हिंदु -मुस्लिम उरूस कमिटीचे जेष्ठ व माजी ग्रामपंचायत सदस्य सिकंदर अफराज यांनी दिली.
ते म्हणाले, गुरुवारी (ता.६) रात्री १० वाजता फरासी कार्यक्रम पार पडला. शुक्रवारी (ता.७) रात्री १० वाजता गंधलेपण कार्यक्रम झाला. पोलीस पाटील बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते हा कार्यक्रम होईल. रात्री गंधरात्र, कुराणखानी तर शनिवारी (ता.८) जयपूर येथील सर्फराज साबरी व बेंगलोर येथील सिम्रण ताज यांचा कवालीचा जंगी मुकाबला होणार आहे.
रविवारी (ता.९) जल्लोष ऑर्केस्ट्रा होणार तर गंधरात्र रोजी शोभेच्या दारूची अतिषबाजी होणार आहे. शुक्रवारी (ता.७) सायंकाळी ७ ते पहाटे ५ वाजेपर्यंत दंडवत कार्यक्रम,शनिवारी (ता.८) भर उरूस, नवैद्य व गलेफ घालण्यात येणार आहे.
सोमवारी (ता.१०) सकाळी १० वाजता विविध शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी कमिटीची गलेफ मिरवणूक होणार आहे.
या स कार्यक्रमाचे उद्घाटन सहकाररत्न उत्तम पाटील, युवा उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांच्या हस्ते होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून दिवंगत सहकाररत्न रावसाहेब पाटील यांच्या आशीर्वादाने उरुसासाठी उत्तम पाटील व उद्योजक अभिनंदन पाटील यांचे सहकार्य लाभत असल्याचे अफराज यांनी सांगितले. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य अब्दुल शेख, भैया अफराज, इम्रान अफराज, अरबाज अफराज यांच्यासह हिंदु मुस्लिम उरुस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta