Monday , April 20 2026
Breaking News

शिवसृष्टी समोरील रस्ता तब्बल एक वर्षानंतर वाहतुकीसाठी होणार खुला

Spread the love

 

बेळगाव : वीस कोटी रुपयांच्या नुकसान भरपाई प्रकरणामुळे वर्षभरापासून चर्चेत असलेला शहापूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र ते जुना पीबी रोड शिवसृष्टी समोरील रस्ता तब्बल एक वर्षानंतर वाहतुकीसाठी 40 फूट रुंद खुला करण्याचा मार्ग महानगरपालिकेने घेतला आहे. वाहतुकीचे होणारी कोंडी तसेच नागरिकांच्या मागणीची दखल घेत जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या पुढाकाराने सदर रस्ता खुला करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. सदर रस्ता तयार करीत असताना सीडीपी मॅप नुसार रस्ता न करता बेकायदेशीरपणे भूसंपादन करत हा रस्ता तयार करण्यात आला होता. प्रशासनाच्या या कृतीच्या विरोधात जमीन धारकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती व नुकसान भरपाईची मागणी देखील केली होती. न्यायालयाने महानगरपालिकेला जमीन मालकाला वीस कोटी रुपयांचे नुकसान भरपाई देण्याचे आदेश बजावले होते. हा रस्ता निर्माण करीत असताना अनेक निवासी व्यावसायिक व औद्योगिक मालमत्तांवर देखील अतिक्रमण झाले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार सदर रस्ता बंद करून संबंधित जागा मूळ मालकाच्या ताब्यात देण्यात आली होती. त्यानंतर हा रस्ता पूर्णतः बंद करण्यात आला होता त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता व वाहनधारकांना लांबचा पल्ला गाठत जुन्या पीबी रोडला जावे लागत होते. याबाबत नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. रस्त्याच्या या समस्येवर मार्ग काढण्यासाठी सीडीपी मध्ये मंजूर असलेल्या 40 फूट रस्ता खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला असून महानगरपालिका प्रशासन या रस्त्याचा सर्वेक्षण करीत असून सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. महानगरपालिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे 2024 पासून बंद असलेला हा रस्ता वाहतुकीला खुला होणार आहे. त्यामुळे नागरिका समाधान पसरले आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे शहापूर परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

शिवजयंती आणि अक्षय तृतीया निमित्त कपिलेश्वर मंदिरात हापूस आंब्यांची आकर्षक आरास

Spread the love  बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात शिवजयंती आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *