
निपाणी (वार्ता) : निपाणी-चिक्कोडी रोडवरील जत्राटवेस मधील महात्मा बसवेश्वर सर्कलमध्ये कार्तिक दीपोत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे हा सर्कल शेकडो देव्यांनी उजळून गेला होता. येथील समाधी मठातील प्राणलिंग स्वामी आणि कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
प्रारंभी स्वामी व पोवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून दिपोत्सवाचे उद्घाटन झाले. त्यानंतर उपस्थित नागरिकांनी लावलेल्या दिल्यामुळे हा परिसर उजळून निघाला. ऊसदरासाठी आंदोलन करून कारखानदारांना योग्य दर देण्यास भाग पाडल्याने परिसरातील शेतकऱ्यातर्फे राजू पोवार यांचा स्वामींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पोवार यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी नेहमी रस्त्यावरील लढाई लढण्याची तयारी असल्याचे सांगितले.
यावेळी कलगोंडा कोटगे, सर्जेराव हेगडे, योगेश कोठीवाले, महेश जनवाडे, दयानंद पाटील, किरण बोरगल्ले, हेमंत सासणे, महेश पाटील, बाळासाहेब आमाते, रोहित चिमणे, बसवराज हुडेदार, महादेव पाटील, विजय चंद्रकुडे, अक्षय बेल्लद यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta