निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात बुधवारी गजानन महाराज प्रकट दिन सोहळा विविध उपक्रमांनी साजरा केला त्यानिमित्त धार्मिक कार्यक्रमासह आरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
येथील रावण गल्ली येथे संत शिरोमणी गजानन महाराज शेगाव सेवा संस्था निपाणीतर्फे गजानन महाराज प्रकट दिन भक्तिमय वातावरणात साजरा झाला. त्यानिमित्त गेल्या आठवड्यापासून पारायण, गजानन महाराज ग्रंथ वाचन, असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आली होते. बुधवारी (ता.२३) प्रकट दिन निमित्त महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. त्याभाविकांनी लाभ घेतला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण उतलेकर, उपाध्यक्ष विलास नारे, खजिनदार रवींद्र मठपती, सेक्रेटरी भूषण मोहिते, शिवाजी पठाडे, संचालक डॉ. सविता रामनकट्टी, गजानन खापे, संजय पांगिरे सचिन रामनकट्टी, सुयोग उतळेकर, प्रतिक उतळेकर, किरण पाटोळे, लता उतळेकर, सारिका खापे यांच्यासह भाविक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta