
निपाणी (वार्ता) : निपाणी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश कदम यांची कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीच्या सदस्यपदी निवड झाली आहे. त्यानिमित्त त्यांचा माजी नगरसेवक संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. माजी नगराध्यक्ष विजय शेटके यांनी स्वागत तर माजी नगराध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. माजी सभापती किरण कोकरे यांनी, कदम यांनी मिळालेल्या संधीचा उपयोग करून काँग्रेस पक्षाला भक्कम करण्याचे आवाहन केले.
माजी नगराध्यक्ष गजेंद्र पोळ यांनी, दिवंगत माजी आमदार रघुनाथराव कदम आणि काकासाहेब पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक कामे मतदारसंघात केली आहेत. त्यांचाच आदर्श घेऊन नेते मंडळींच्या सहकार्याने या भागात विकास कामे करण्याचे आवाहन केले. राजेश कदम यांनी, सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून काँग्रेस पक्षातील तळागाळातील कार्यकर्त्याशी संर्पक ठेवून पक्ष वाढीसाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
यावेळी अस्लम शिकलगार, धनाजी निर्मळे, दिलीप पठाडे, रियाज बागवान, शशिकांत चडचाळे, रवी श्रीखंडे, युवराज पोळ, दीपक ढणाल, अशोक लाखे, प्रकाश पोटजाळे, सुरेश गाडीवड्डर, जीवन घस्ते, विनोद बल्लारी, अल्लाबक्ष बागवान, दिलीप पठाडे, सुखदेव मगदूम यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta