Friday , November 22 2024
Breaking News

शेतकऱ्यांच्या समस्या त्वरित सोडवा

Spread the love
रयत संघटना : जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
निपाणी (वार्ता) : तालुक्यातील विविध गावांमध्ये शेतकऱ्यांना बऱ्याच वर्षापासून पिक कर्ज योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी असून त्याचे तात्काळ निवारण करावे, या मागणीसाठी चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता.२५) जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांना तालुक्यातील ग्राम विकास अधिकारी सेक्रेटरी यांची बैठक बोलावून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची सूचना केली.
पडलिहाळ येथील पिकेपीएसला सन २०१३ साली ९०  लाखाची पत मंजूर झाली होती. त्यापैकी केवळ ५५ लाख रुपये पिक कर्ज शेतकऱ्यांना देण्यात आले. उर्वरित  शेतकऱ्यांना जानुन- बुजुन कर्ज देण्यात आले नाही.२०१८-१९साली माजी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांनी पडलीहाळ पीकेपीएसला १ कोटी ५१ लाख रुपये मंजुर केले. तरीही स्थानीक राजकारणामुळे शेतकऱ्यांना कर्जापासून वंचीत ठेवण्यात आले. या काळात सरकारने तीन वेळा  कर्जमाफी करूनही शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही.
गेल्या काही वर्षापासून पडलिहाळ पीकेपीएसमध्ये जिल्हा बँकेतर्फे शेतकऱ्यासाठी पिक कर्ज मंजूर केले जात आहे. पण याठिकाणी पदाधिकारी नसल्याने त्याची जबाबदारी प्रशासकावर पडली आहे. स्थानिक राजकारणामुळे अनेक शेतकऱ्यावर अन्याय होत आहे त्यामुळे पीककर्जापासून अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. गेल्या दोन वर्षापासून कोरोना, लॉकडाऊन, अतिवृष्टी महापूर व इतर कारणाने शेतकरी अडचणीत आला आहे. अशा परिस्थितीत त्यांना पीक कर्जही मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. यापुढील काळात स्थानिक राजकारण बाजूला ठेवून गरजू शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याची व्यवस्था करावी. अतिवृष्टी व महापुरामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीसह घरांची पडझड झाली आहे. त्यांनाही नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी राजू पोवार यांनी केली. त्यानुसार जिल्हाधिकारी हिरेमठ यांच्याशी सविस्तर चर्चेनंतर अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना  पिक कर्ज वाटपासह शेतकऱ्यांच्या समस्या सोडण्यासाठी ग्राम विकास अधिकारी व ग्रामपंचायत सेक्रेटरींची बैठक बोलावण्याची सूचना निपाणीचे तहसीलदार डॉ. भस्मे यांना केली. याबाबतचे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी संघटनेचे राजाध्यक्ष चुनाप्पा पुजारी, निपाणी शहर अध्यक्ष उमेश भारमल, सेक्रेटरी भगवान गायकवाड, बाळासाहेब हादीकर, बाळासाहेब पाटील, बाबासाहेब पाटील, नामदेव साळुंखे, संजय नाईक, बाळासाहेब कांबळे, सर्जेराव हेगडे, बाबासाहेब पाटील, पडलिहाळ येथील शेतकरी
संजय जाधव, मानसिंग पाटील, रणजीत जाधव, सचिन पाटील, संभाजी पाटील, अरविंद पाटील, सतिश जाधव, संदीप चिमगांवे, एकनाथ पाटील, सोहन जाधव, समर पाटील, मारुती शेगळे, कुमार कोरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

तवंदी घाटात भीषण अपघात: एकाचा मृत्यू, १५ गंभीर जखमी

Spread the love  बेळगाव : पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात भरधाव वेगात आलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *