
कृषी पंडित सुरेश पाटील यांच्या सादरीकरणाला यश ; केंद्र सरकारकडून हिरवा कंदील
निपाणी (वार्ता) : ग्रामीण आणि डोंगराळ भागात वन्य प्राण्यांकडून बहुतांश पिकांचे दरवर्षी नुकसान होते. शेतकरी संकटात सापडत आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन बुदिहाळ येथील कृषी पंडित सुरेश पाटील यांनी केंद्रीय कृषी विभागाने पंतप्रधान पिक विम्यातील सुधारण्या साठी तज्ञांची समिती स्थापन केली होती. त्यामध्ये सुरेश पाटील यांनी प्रबंधासह मार्गदर्शन केले होते. त्यांना यामध्ये विशाल असून वन्यप्राण्याकडून होणाऱ्या पीक नुकसान भरपाईचा पिक विम्यामध्ये समितीच्या शिफारशीनुसार सुधारित पिकविमा योजना २०२६ खरीप हंगामापासून लागू करण्यास केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंजुरी दिली आहे.
शेतकऱ्यांना सर्वत्र हत्ती, रानगवा, नीलगाय, हरण, माकड अशा विविध वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतकरी जखमी होण्यासह पिकांचे नुकसान सहन करावे लागत आहे. पंतप्रधान पिक विमा योजनेच्या नवीन सुधारित आराखड्यांतर्गत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यासह पीक नुकसान ‘स्थानिक जोखीम’ या श्रेणीतील पाचवा ‘ॲड ऑन कव्हर’ म्हणून मान्यता दिली आहे.
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे पिकांचे नुकसान होऊनही पिक विमा योजनेत त्यासाठी भरपाई मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही भरपाई पासून वंचित राहावे लागत होते. पीक नुकसानीसाठी भरपाई द्यावी अशा पद्धतीचे सादरीकरण ‘कृषी- पंडित सुरेश पाटील यांनी तेलंगणा येथे झालेल्या दक्षिण विभाग कृषी मूल्य आयोग बैठकीत केले होते.
——————————————————————-

‘’अनेक वर्षापासून शेतीमध्ये अनेक प्रयोग करत आहे. वन्य प्राण्याकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, याबाबतचे सादरीकरण केंद्रीय कृषी आयोगाच्या बैठकीत केले होते. त्याला यश मिळाले असून पुढील वर्षापासून या नुकसानीचा पिक विमा योजनेत समावेश होणार आहे.’
-कृषी पंडित सुरेश पाटील, बुदिहाळ (ता.निपाणी)
Belgaum Varta Belgaum Varta