
निपाणी (वार्ता) : येथील दुआ फाउंडेशन तर्फेहजरत टिपू सुलतान जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त टिपू सुलतान यांच्या प्रतिमेची पूजा करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
जयंतीनिमित्त येथील अंजुमन सभागृहात रक्तदान, नेत्र तपासणी शिबीर, शैक्षणिक साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्त्यांचा सत्कार, भीम मधील वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना जेवण वाटप करण्यात आले. शिबिरात १६३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. तर ७० नेत्र रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. यावेळी बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, सहकाररत्न उत्तम पाटील, प्रसन्न कुमार गुजर, अन्वर हुक्केरी, नगरसेवक शेरू बडेघर, अब्बास फरास यांची प्रमुख उपस्थिती होती. दुआ फौंडेशनचे अध्यक्ष जावेद काझी, उपाध्यक्ष हुजेफ बागवान, सेक्रेटरी फुरकान कुन्नुरे, संस्थापक सदस्य टिपूसुलतान ननदी, सैफ पटेल, सद्दाम नगरजी, अस्लम शिकलगार, इम्रान बडेघर, नूर दफेदार, मुजाहिद शेख, हाफिज आलीम हुसेन शेख, नजीर शेख, जुबेर मणेर, गौस मुल्ला, मज्जीद बागवान, अनस बगबान, अत्ताउल्लाह जमादार, रमजान नगरजी, हुसेद पठाण यांच्यासह दुवा फौंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते होते.
Belgaum Varta Belgaum Varta