
निपाणी (वार्ता) : येथील फ्रेंड्स ग्रुपतर्फे दिवंगत माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या प्रेरणेने प्रथमच ‘चेअरमन चषक’ ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा बुधवार पासून (ता.२६) करण्यात आल्या आहेत. या स्पर्धा येथील समर्थ मंडळ व्यायाम शाळेच्या मैदानावर दिवंगत हिमांशू उर्फ शशांक संयोजित पाटील यांच्या स्मरणार्थ रविवार अखेर (ता.३०) होणार आहेत. त्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती टाऊन प्लॅनिंग अथॉरिटीचे अध्यक्ष संयोगीत उर्फ निकु पाटील यांनी दिली.क्रिकेट मैदानाची पाहणी करून ते बोलत होते.
स्पर्धेतील विजेत्या संघांना अनुक्रमे प्रथम ते चतुर्थ क्रमांकासाठी ५१ हजार रुपये, ३१ हजार रुपये रुपये, १० हजार, १० हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. याशिवाय मॅन ऑफ दि मॅचसाठी (फायनल) ५ हजार रुपये, मॅन ऑफ दि सेरीजसाठी सायकल बक्षीस देण्यात येणार आहे.
या स्पर्धा ग्रामीण एक गाव एक टीम पद्धतीने होणार आहेत.अधिक माहितीसाठी सतीश शिरगावे, युवराज जाधव, चेतन पांगिरे, संतोष कांबळे (कार्लोस) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पाटील यांनी केले. यावेळी अरविंद पारळे, बंटी कांबळे, संदीप माने (डंपर), अमित जाधव (सापळे), अक्षय यमगेकर (छोटू), अक्षय सुबान्नावर, प्रथमेश आडेकर, सागर पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta