
मंत्री शिवराज तंगडगी यांची माहिती : बेळगावमध्ये समाजाची चिंतन बैठक
निपाणी (वार्ता) : भोवी वडर समाजाच्या विकासासाठी कर्नाटक राज्य सरकार कटिबद्ध असून या समाजासाठी भरीव असा ६०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामधून अनेक सोयी-सुविधा व योजना लागू होणार आहेत. त्याचा लाभ समाज बांधवांनी -घेऊन आपल्यासह समाजाचा विकास साधावा. राज्य सरकार या पुढील काळातही भोवी वडर समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे राज्याचे कॅबिनेट मंत्री शिवराज तंगडगी यांनी सांगितले.
बेळगाव येथे झालेल्या भोवी-वडर समाजाच्या चिंतन बैठकीत बोलत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भोवी वडर समाजाचे राज्याध्यक्ष एम. रामाप्पा होते. या बैठकीसाठी हिम्मडी सिध्दरामेश्वर महास्वामीजी यांचे दिव्यसानिध्य लाभले होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी घालून या बैठकीचे उदघाटन झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
मंत्री शिवराज तंगडगी पुढे म्हणाले, राज्य सरकारने समाजासाठी मंजूर केलेल्या निधीतून गरजू घटकांना विविध व्यवसायासह रोजगारासाठी आर्थिक सवलती व योजनांचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले. यावेळी एम. रामाप्पा यांनी समाजासाठी सरकारने लागू केलेल्या सुविधा, योजना व सवलती यांची माहिती देत त्याचा समाजबांधवानी लाभ घ्यावा असे आवाहन केले. बैठकीस आमदार ए. सी. श्रीनिवास, व्ही. व्यंकटेश, एम.
चंद्रप्पा, मंजुळा निंबावळी, माजी जिल्हा पंचायत सदस्य व समाजाचे राज्य संचालक राजेंद्र वडर-पवार यांच्यासह निपाणी,
चिक्कोडी, अथणी, रायबाग, गोकाक यासह जिल्ह्यातील समाज बांधव उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta