
टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील यांची माहिती ; दूध संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील दौलत मळ्यामधील कृषिधन दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त निकु पाटील मित्रपरिवार व मळा ग्रुपतर्फे गुरुवारी (ता. १ जानेवारी) सकाळी ९ वाजता विविध शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. हाल सिद्धनाथ मंदिर ते नांगनूर शाळा या मार्गावर होणाऱ्या या स्पर्धेतील जनरल बैलगाडी शर्यतील अनुक्रमे विजेत्यांना तीन दुचाकींचे बक्षीसे देण्यात येणार आहे शिवाय इतर दोन गटातील शर्यतीसाठी रोख रकमेची बक्षिसे दिली जाणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक व टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील यांनी दिली.
निकु पाटील म्हणाले, संस्थेतर्फे गेल्या १४ वर्षात दूध उत्पादकांसाठी विविध योजना व सवलतींचा लाभ मिळवून दिला आहे. यावर्षी संस्थेतर्फे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जनरल बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये अनुक्रमे युनिकॉर्न, स्प्लेंडर व एचएफ-डीलक्स अशा तीन लाख रुपये किमतीच्या दुचाकींचे बक्षीस अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकासाठी दिले जाणार आहे. तर जनरल घोडा- बैलगाडी शर्यतीसाठी अनुक्रमे १५,०००, १०,०००, ७,००० तर आदत बैल-घोडा शर्यतीसाठी ७,०००, ५,०००, ३,००० जनरल घोडागाडीसाठी १००००,७००० व ५००० रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. ही स्पर्धा आंतरराज्य स्वरुपात असून स्पर्धकांनी संस्थेचे डॉ. सचिन काटकर, तात्यासाहेब वालीकर, प्रदीप इंगवले, आणि स्वप्निल पावले यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पाटील यांनी केले आहे. यावेळी संस्थेचे संचालक व पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta