Monday , September 21 2026
Breaking News

खासदार धैर्यशील माने यांच्यावर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडणार : करवे

Spread the love

 

बेळगाव (वार्ता) : गेल्या पन्नास वर्षांपासून महाराष्ट्रातील नेते बेळगावमध्ये येऊन चिथावणीखोर भाषणे देऊन भाषिक द्वेषाची बीजे पेरत आहेत. कर्नाटकातील नागरिक राज्योत्सव साजरा करतात. तेव्हा समिती बेळगावमध्ये काळा दिवस पाळतात आणि बेळगावमधील अधिवेशनादरम्यान महामेळावा भरवणारे राज्यद्रोही महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात आमंत्रित करून त्यांना चिथावणीखोर भाषणे करायला लावतात. त्यामुळे बेळगावच्या भाषिक संबंधांना नुकसान पोहोचले आहे. अशा महाराष्ट्रातील नेत्यांवर केंद्र सरकारने कारवाई करावी, अशी हास्यास्पद मागणी करवे कार्यकर्त्यांनी खासदार जगदीश शेट्टर यांच्या मार्फत निवेदन देऊन केंद्राकडे केली आहे.

कालच महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न तज्ञ कमिटीचे अध्यक्ष, खासदार धैर्यशील माने यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी करत निवेदन दिले. याच निराशेपोटी करवे कार्यकर्त्यांनी आज खासदार धैर्यशील माने यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून आपला निषेध नोंदवला.

त्यानंतर खासदार जगदीश शेट्टर यांना निवेदन देऊन माने यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आवाहन केंद्र सरकारला केले.
—————————————————————–
आंदोलनाचा इशारा

खासदार धैर्यशील माने यांच्यावर कारवाई करण्यासाठी संसदेत आवाज न उठवल्यास या संदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली जाईल. शिवाय कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन अपरिहार्य ठरेल, असा इशारा त्यांना देण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *