
बोरगाववाडीत रस्ते, गटार कामाचा प्रारंभ
निपाणी (वार्ता) : ढोणेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत १५ व्या वित्त आयोगातून बोरगाव वाडी येथे रस्ता आणि गटार बांधकामासाठी निधी मंजूर झाला होता. या कामाचा प्रारंभ सहकाररत्न उत्तम पाटील*यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांचा हस्ते करण्यात आला.
ग्रामपंचायत अध्यक्षा गीतांजली माने यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते या कामाचा प्रारंभ करण्यात आला.
सहकाररत्न उत्तम पाटील यांनी, ग्रामीण भागातील गाव पातळी वरील रस्ते चांगल्या पद्धतीने करण्याच्या उद्देशाने हा निधी खर्च केला जात आहे. याशिवाय आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी गटारींची सोय केली जात आहे. याशिवाय विकासकामांमुळे परिसरातील नागरिकांना चांगल्या रस्त्यांची सुविधा मिळून सांडपाणी निचऱ्याची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. ग्रामविकासाच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल निश्चितच सर्वसामान्य जनतेसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळीग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब खोत, शिवाजी नागराळे, दादासाहेब सुतार, तानाजी जाधव, नंदिनी कांबळे, विजय माने, सुनील खोत, केंपाण्णा खानुरे, चंद्रकांत खोत, दत्ता खोत, जितेंद्र टाकमारे, दादासाहेब खोत, प्रकाश गुळगुळे, कुमार गुळगुळे, भारत एकसंबे, आण्णाप्पा कळंत्रे, शिवगोंडा खोत, सदाशिव भदरगडे, धोंडिबा खोत, शिवगोंडा पाटील, राजेंद्र शिरगावे, काशिनाथ खोत, सतीश टाकमारे, भारत गुळगुळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta