
निपाणी (वार्ता) : मिरज येथील सद्गुरू संत बाळूमामा भक्त भजनी मंडळातर्फे मिरज, आप्पाचीवाडी, मेतके मार्गे आदमापूर अशी पायी दिंडी काढण्यात आली. आप्पाचीवाडी येथे जात असताना आडी येथील डोंगराजवळील मल्लिकार्जुन मठामध्ये कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे कार्याध्यक्ष राजू पोवार व पदाधिकाऱ्यांनी या दिंडीचे स्वागत केले. ही दिंडी मिरज येथून सोमवारी (ता.२९) आदमापुरकडे निघाली आहे. मंगळवारी बारवाड येथील संगमेश्वर मंदिर, आडी येथील मल्लिकार्जुन मठमार्गे आप्पाचीवाडीकडे मार्गस्थ झाली. यावेळी शिवाजी वाडेकर, पिंटू लाड, बाबासाहेब पाटील, जनार्दन वाडेकर, सागर पाटील, अक्षय पाटील, प्रवीण चौगुले, चिनू कुळवमोडे, अर्जुन नाईक, बबन जामदार, विजय गुरव अण्णासाहेब पाटील, मयूर पोवार यांच्यासह कर्नाटक राज्य रयत संघटनेचे विविध शाखांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta