Monday , June 1 2026
Breaking News

युवा पिढीने शिवरायांची कार्यपद्धती समजून घ्यावी

Spread the love

 

सचिन खोपडे; मावळा ग्रुपची गड-किल्ले मोहीम यशस्वी

निपाणी (वार्ता) : सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अष्टप्रधान मंडळ तयार करून सुराज्य निर्माण करण्यासह प्रजेवर होणारा अन्याय दूर केला. रयतेचा राजा होताना त्यांनी दिलेला कानमंत्र आजही जोपासला जात आहे. जातीय सलोखा राखत भाषिक मतभेद आणि अन्याय करणाऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम शिवरायांसह मावळ्यांनी केले. त्यामुळे युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची कार्य पद्धत समजून घ्यावी, असे आवाहन व्याख्याते सचिन खोपडे यांनी केले.
येथील मावळा ग्रुप तर्फे पाचवी मोहीम ‘अजिंक्यतारा व तोरणा’ अंतर्गत आयोजित व्याख्यानात बोलत ते होते. निपाणीत प्राणलिंग स्वामींच्या उपस्थितीत ग्रुपचे संस्थापक आकाश माने व अक्षरा माने यांच्या हस्ते शिव पुतळ्याचे पूजन तर उद्योजक प्रविणभाई शहा यांच्या हस्ते शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. सहकाररत्न चंद्रकांत कोठीवाले यांच्या हस्ते टाऊन प्लॅनिंगचे अध्यक्ष निकु ऊर्फ संयोजित पाटील, रोहन कोठीवाले, सहकाररत्न डॉ. सी. बी. कुरबेट्टी, डॉ. भारत पाटील वाहन पूजन झाले.
ग्रुपचे अध्यक्ष आकाश माने यांनी प्रास्ताविक तर दादासाहेब जनवाडे यांनी स्वागत केले.
मोहिमेत राहुल सडोलकर, संजय चिकोर्डे, उदय शिंदे, सुभाष कदम, सुशांत कांबळे, अनिल चौगुले, शांतीनाथ मुदकुडे, विनायक खवरे, सन्मेश जाधव, सागर खांबे, हेमंत चव्हाण, उमेश गंथडे, राहुल पाटील, अमृत ढोले, महादेव बन्ने, विजयकुमार बुरुड, महेश कानडे, पृथ्वीराज घोरपडे, दयानंद साजन्नावर, नवनाथ खवरे, विक्रम जाधव, पुंडलिक निकम, आकाश चव्हाण, सागर पाटील, राजू मोहीते यांच्यासह सुमारे ३०० मावळे व रणरागिनी सहभागी झाल्या होत्या.

About Belgaum Varta

Check Also

भ्रष्ट कर्मचाऱ्याची बदली न केल्यास नगरपालिकेसमोर उपोषण

Spread the love  आयुक्तांना दिले निवेदन; उतारे देण्यासाठी रकमेची मागणी निपाणी (वार्ता) : निपाणी येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *