
निपाणी (वार्ता) : येथील जत्राटवेसमध्ये महात्मा ज्योतिबा फुले, शाहू, आंबेडकर सामाजिक व सांस्कृतिक संघटनेतर्फे शौर्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सहकाररत्न उत्तम पाटील यांनी सहभाग घेऊन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
उत्तम पाटील यांनी, शौर्य दिन हा भीमा कोरेगाव विजयस्तंभाशी संबंधित ऐतिहासिक दिन आहे. १ जानेवारी १८१८ रोजी झालेल्या भीमा कोरेगावच्या लढाईचे स्मरण म्हणून साजरा केला जातो. या लढाईत ब्रिटिश सेनेतील महार समाजाच्या शूर सैनिकांनी पेशवाईच्या अन्यायकारक आणि दडपशाहीविरुद्ध शौर्य, धैर्य व आत्मसन्मानाचे अद्वितीय दर्शन घडवले. हा दिवस केवळ एका युद्धाच्या विजयाचा नसून अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे, स्वाभिमान जागविण्याचा आणि समानतेसाठी लढण्याचे प्रतीक असल्याचे सांगितले.
यावेळी नगरसेवक शौकत मनेर, शेरू बडेघर दत्ता नाईक, दिलीप पठाडे, इम्रान मकानदार, आर एस सनदी, जीवन घस्ते यांच्यासह नगरपालिकेचे आजी, माजी नगरसेवक, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta