Monday , May 25 2026
Breaking News

निपाणीतील शर्यतीत ‘एमटी. बैज्या, आरएक्स बैज्या ‘कृषिधन केसरी’चा मानकरी

Spread the love

 

हरण्या- सुंदर यांने पटकवली स्प्लेंडर दुचाकी; शर्यती शौकिनांच्या फिटले डोळ्याचे पारणे

निपाणी (वार्ता) : येथील दौलतराव पाटील मळ्याल कृषीधन दूध उत्पादक संस्थेच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी (१ जानेवारी) आयोजित विनालाठी-काठी आंतरराज्य जनरल बैलगाडी शर्यतीत कांचनपूर येथील महेश मेजर यांच्या ‘एमटी. बैजा, आरएक्स बैज्या बैल जोडी शर्यतीचे अंतर १७ मिनिटात पार करून प्रथम क्रमांकाच्या ‘कृषिधन केसरी’ची मानकरी ठरली. त्यांना व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते ‘युनिकॉर्न’ दुचाकी देऊन गौरविण्यात आले.
या शर्यतीत कडलगा येथील राहुल देसाई यांच्या ‘हरण्या-सुंदर’ या बैल जोडीने हेच अंतर १७ मिनिटे २ सेकंदात पार करून द्वितीय क्रमांकाची स्प्लेंडर प्लस दुचाकी बक्षीस मिळवले. आणि उमराणी येथील राजू उमराणी यांच्या ‘बैज्या-शिल्या’ यांच्या बैलजोडीने तृतीय क्रमांकाचे एचएफ डीलक्स दुचाकीचे बक्षीस मिळवले. तीनही बैलगाड्या केवळ दोन-तीन सेकंदाच्या अंतरावर आल्याने व नेटके नियोजन केल्याने शर्यती शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फिटले. हालसिध्दनाथ मंदिर श्रीपेवाडी ते नांगनूर मळा (डांबरी पट्टा) येथे या मार्गावर शर्यती झाल्या. शर्यतीमध्ये ११ बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या.
जनरल घोडा-बैलगाडी शर्यतीमध्ये काकासाहेब पाटील-आडी, बेलवळे पांडू-बेलवळे आणि प्रमोद डांगरे- इचलकरंजी यांच्या गाड्यांनी प्रथम ते तृतीय क्रमांकाची १५ हजार, १० हजार व ७ हजार, जनरल घोडा-गाडी शर्यतीमध्ये महेश तावदारे, सोहम रेंदाळे आणि विकास कांबळे (सर्व निपाणी) यांच्या गाड्यांनी प्रथम ते तृतीय क्रमांकाची १० हजार, ७ हजार व ५ हजार रुपयांची बक्षिसे मिळवली.
आदत घोडा -बैलगाडी शर्यतीत सुरज नाईक- बारडवाडी, माऊली-कागल आणि महेश कांबळे-भाटवडे यांच्या गाड्यांनी प्रथम क्रमांकाची अनुक्रमे ७ हजार, ५ हजार आणि ३ हजार रुपयांची बक्षिसे मिळवली. सर्व विजेत्यांना बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, अशोकराव पाटील, टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील सुजय पाटील, राजेश कदम, नगरसेवक विलास गाडीवड्डर, बाळासाहेब देसाई- सरकार, धनाजी भाटले व मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. मराठा बँकेचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते मैदानाचे पूजन झाले. निकु पाटील यांनी, आतापर्यंत विविध स्पर्धा भरविल्या असून या पुढील काळातही शेतकरी बांधवांच्या मागणीनुसार अशा शर्यती भरविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. नगरसेवक विलास गाडीवड्डर, पंकज पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी
दत्तकुमार पाटील, गजेंद्र पोळ, किरण पाटोळे, नवनाथ चव्हाण, दीपक वळीवडे, संदीप चावरेकर, डॉ. सचिन काटकर, डॉ. सचिन काटकर, तात्यासाहेब वालीकर, वसंत धारव, अरुण आवळेकर, बंडा खिलारे, किरण पाटोळे, ॲड. अशोक शिंदे, रणजित मगदूम, रमेश भोईटे, सागर पाटील यांच्यासह कृषिधन दूध संस्थेचे पदाधिकारी व मळा ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते. बेडग येथील सयाजी शिंदे यांनी शर्यतीचे समालोचन केले.

About Belgaum Varta

Check Also

आप्पाचीवाडी पुलासाठी आरपारची लढाई; रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार

Spread the love  २८ रोजी पाटबंधारेसह तालुका पंचायत कार्यालयाला टाळे ठोकणार निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *