Tuesday , March 3 2026
Breaking News

युवक, युवतींनी सैनिक प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा : खासदार प्रियांका जारकीहोळी

Spread the love

 

तवंदीत सैनिक भवनाचा पाया खुदाई

निपाणी (वार्ता) : आपण खासदार झाल्यानंतर आलेल्या पहिल्या निधीतून सर्वप्रथम सैनिकांच्या भवनासाठी २० लाखाचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी १० लाख रुपये दिले असून लवकरच उर्वरित निधी देणार आहोत. जारकीहोळी फाउंडेशनतर्फे ८ केंद्रामधून तीन भाषांमधून सैनिक भरतीसाठी पूर्णपणे मोफत प्रशिक्षण दिले जाते.त्याचा ग्रामीण भागातील युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
तवंदी येथे २० लाखांच्या निधीतून नव्याने समुदाय भवनाचा पाया खोदाई करून त्या बोलत होत्या.
प्रारंभी राजू गुरव यांनी प्रास्ताविकात समुदाय भवन निर्मितीमागील उद्देश स्पष्ट केला. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे म्हणाले, देशाचे संरक्षण करणा-या सैनिकांसाठी निधी मंजूर करून जारकी होळी यांनी सैनिका प्रति आदर व्यक्त केला आहे.
काँग्रेसने अनेक महत्त्वाकांक्षा योजना राबवून त्याचा सर्वसामान्यांना दिला जात आहे. आगामी निवडणुका पक्ष चिन्हांवर असतील. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे नेतृत्व कटिबध्द आहेत. ग्रामस्थांनी सैनिक भरतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. आपण ग्रामस्थांच्या पाठीशी असून ग्रामस्थांनीही काँग्रेस पक्षासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.
यावेळी केपीसीसी सदस्या सुप्रिया पाटील, सहकाररत्न उत्तम पाटील, टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकू पाटील, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, सुजय पाटील, पंकज पाटील, बसवराज पाटील, सुमित्रा उगळे, राजेंद्र वडर, ग्रामपंचायत अध्यक्ष लक्ष्मी कांबळे, किरण रजपूत, प्रतीक शहा, निरंजन पाटील, प्रकाश पाटील, मारुती पाटील, शिवाजी पाटील, विष्णू पाटील यांच्यासह यरनाळ, तवंदी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. बाळासाहेब पाटील यांनी केले. संजय पाटील यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘पंचहमी’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सहकार्य करावे

Spread the love  गॅरंटी योजना कमिटी अध्यक्ष रमेश जाधव ; निपाणी तालुका पातळीवरील बैठक निपाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *