Monday , June 1 2026
Breaking News

डी. वाय. सी. भरतेशमध्ये कला आणि गुणांचा मेळावा

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव येथील भरतेश शिक्षण संस्था संचलित डी. वाय.सी. भरतेश शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे श्री नागराज काळे, निवृत्त प्राध्यापक सीटीई बेळगाव, सन्माननीय अतिथी श्री. अशोक दानवाडे, एम. डी. जैन इंजिनिअरिंग, शाळेचे चेअरमन श्री.आर. पी. रामगोंडा, शाळा सुधारणा समितीचे सदस्य श्री.आप्पासाहेब चौगुले, मुख्याध्यापक एम. बी. चौगुले, श्री. एम. बी. बखेडी, स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष श्री. ए. ए. समाजे आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शिवतांडव नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते
दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. श्री नागराज काळे यांनी आपल्या मार्गदर्शनातून मोबाईल व बाह्य खाद्यपदार्थापासून दूर ठेवण्याचा संदेश पालकांना व विद्यार्थ्यांना दिला. स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी तयार व्हावे असे आवाहन केले. श्री. ए. ए. समाजे यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला यानंतर विविध स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. शाळेचा माजी विद्यार्थी दर्शन उपरी याचे अग्निवीर आर्मी मध्ये तसेच अंजली पाटील व नेत्रा पत्रावळी या जुडो खेळाडूंचे राष्ट्रस्तरीय निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गणपती, मंगळागौरी, कृष्णदेवराय, महाभारत, मैत्री, शिक्षण, संगीत आधी गीतावर सामूहिक नृत्य सादर करून पालकांची व ती त्यांची मने जिंकली. कु. दिव्या कमार व भारती
नरसुगोळ या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. श्रुती पाटील हिने आभार प्रदर्शन करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

About Belgaum Varta

Check Also

बालवीर विद्यानिकेतनमध्ये विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

Spread the love  बेळगाव : बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन शाळेत नवीन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *