निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या भिवशी येथील शाखेचे उद्घाटन राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते करण्यात आले. संघटनेच्या शाखा अध्यक्षपदी अक्षय पाटील, गौरवाध्यक्षपदी उपाध्यक्षपदी प्रीतम कांबळे, कार्याध्यक्षपदी शुभम म्हाळुंगे, उपाध्यक्षपदी प्रवीण चौगुले, सेक्रेटरीपदी जगदीश लोहार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
शाखा संचालकपदी मारुती चौगुले मधुकर पाटील, दादू चौगुले, रोहित पाटील, विशाल हनिमनाळे, सविता पाटील, शालन लोहार, मंगल चौगुले, स्वागता पाटील, वैशाली कांबळे यांची निवड करण्यात आली. शाखा पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर सर्वच सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी, परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार येथे शाखेचे उद्घाटन झाले आहे. त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी याबाबत दक्ष राहून शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहावे. शिवाय शेतकऱ्यांच्या समस्या शासन दरबारी मांडून त्याबाबत न्याय देण्याचा प्रयत्न संघटनेतर्फे केला जाणार असल्याचे सांगितले.
यावेळी सुभाष चौगुले, प्रकाश क्षीरसागर, विजय गुरव, बबन जामदार, कलगोंडा कोटगे, संजय पोवार, एम. वाय. गोकार, महादेव पाटील, आनंदा गायकवाड, शिवाजी वाडेकर, शुभम मगदूम, सागर पाटील, सिद्धू मिरजे, मधुकर पाटील, बाळासाहेब ऐवाळे, संजय जोमा, बाबासाहेब पाटील, सागर हवले, राजू उपाध्ये, शुभम महाळुंगे, कांबळे, मयूर पोवार, एकनाथ सादळकर, ताराबाई पाटील, वैशाली म्हाळुंगे यांच्यासह कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते. आनंदा गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.
Belgaum Varta Belgaum Varta