
उत्तम पाटील युवाशक्ती, समविचारी आघाडीतर्फे आयोजन ; परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
निपाणी (वार्ता) : मकर संक्रातीच्या पार्श्वभूमीवर ममदापूर येथे उत्तम पाटील युवाशक्ती व समविचार आघाडी यांच्यातर्फे हळदी–कुंकू व ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम पार पडला. त्यामध्ये सरिता पाटील या ममदापूरच्या होम मिनिस्टर ठरल्या. त्यांना मीनाक्षीताई पाटील, धनश्री पाटील, विनयश्री पाटील यांच्या हस्ते मानाची पैठणी आणि फ्रिज बक्षीस देण्यात आले.
यावेळी सहकाररत्न उत्तम पाटील अरिहंत बँकेचे अध्यक्ष अभिनंदन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
होम मिनिस्टर स्पर्धेत ज्योती पाटील, पूजा जरग, आशा सुतार, राजश्री पाटील, सुषमा आवटे, श्वेता पाटील, प्राजक्ता आवटे, वैशाली कोळी, आणि बबिता बामणे यांनी द्वितीय ते दहाव्या क्रमांकाची बक्षिसे पटकाविली. त्यांना तिजोरी, दिवाण, शिलाई मशीन, ड्रेसिंग टेबल, मिक्सर, शेगडी, डिनर सेट, कुकर अशा भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. याशिवाय शिवानी पाटील, अर्चना लोहार पूनम पोवार यांचा विशेष पैठणी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विविध गुणवंत व मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडला.
कार्यक्रमास ग्रामपंचायत अध्यक्षा विद्या शिंदे, उपाध्यक्ष गजानन कावडकर, सदस्य निरंजन पाटील-सरकार, प्रकाश गायकवाड, समरजितसिंह निंबाळकर, युवराज पाटील, संजय पाटील, विवेकानंद सोळांकुरे, महारुद्र स्वामी, रावसाहेब गोरवाडे, प्रकाश पाटील, राजवर्धिनी पाटील-सरकार, रोहिणी जगदाळे, स्नेहल स्वामी, अनुजा पाटील, राधिका सोळांकुरे, निता राऊत यांच्यासह परिसरातील महिला उत्तम पाटील युवाशक्तीचे कार्यकर्ते व महिला उपस्थितीत होत्या. कोल्हापूर येथील प्रल्हाद पाटील यांनी या स्पर्धेचे समालोचन केले.
Belgaum Varta Belgaum Varta